विहिंपच्या हितचिंतक मोहिमेतून धर्मांतर, लव्ह जिहाद आणि गोवंश रक्षण यांविषयी जागृती करणार !

विश्‍व हिंदु परिषदेच्या वतीने ६ नोव्हेंबरपासून संपूर्ण देशात हितचिंतक, म्हणजेच सदस्यता मोहीम चालू करण्यात आली आहे. २० नोव्हेंबरपर्यत संपूर्ण भारतात हिंतचिंतक मोहीम चालू रहाणार आहे.

गोशाळेच्या माध्यमातून २०० गोवंशियांचा सांभाळ !

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून चालवणार्‍या जाणार्‍या गोशाळेच्या माध्यमातून २०० लहान आणि मोठ्या अशा गोवंशियांचा सांभाळ केला जात आहे. गायींपासून मिळणारे दूध हे प्रतिदिन नैमित्तिक पूजेसाठी वापरण्यात येते, तर उर्वरित दूध हे रुग्णाईत, तसेच लहान बालकांचे पालक यांना विक्री केली जाते.

जळगाव येथे गोरक्षकांनी मृत गायीचे कुत्र्यांपासून रक्षण केले !

शहरातील जळगाव ते संभाजीनगर महामार्गालगत अनुमाने रात्री १० वाजता एक गाय मृतावस्थेत पडलेली होती. याविषयीची माहिती शहरातील श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख गजानन माळी यांना मिळाल्यावर ते तात्काळ घटनास्थळी पोचले.

गोवंशियांना गोशाळेत सोपवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निवाडा !

‘१७.३.२०१९ या दिवशी परभणी ग्रामीण येथे एक फौजदारी गुन्हा नोंद झाला होता. १५ बैल आणि ३ म्हशी यांना छोट्या ट्रकमधून अतिशय दाटीवाटीने घेऊन जात असतांना गोतस्करांना पकडण्यात आले होते.

गोरक्षकांनी वाचवले १३ गायींचे प्राण !

गोवंशहत्या बंदी कायद्याची कार्यवाही कठोरतेने होत नसल्यानेच असे वारंवार घडते !

शहापूर (ठाणे) येथे पोलीस उपनिरीक्षकांकडून गोरक्षकांना शिवीगाळ आणि आक्रमण !

शहापूर तालुक्यातील डोळखांब परिसरात रानविहीर घाटामध्ये जनावरांची वाहतूक करणारा टेंपो गोरक्षकांनी पोलिसांच्या साहाय्याने  पकडला होता, तर एक टेंपो निघून गेला. या कारवाईविषयी चौकशी करण्यासाठी गेलेले गोरक्षक नरेश गोडांबे यांना पोलीस उपनिरीक्षक हनुमंत पवार यांनी शिवीगाळ…

‘गायीला राष्ट्रीय पशू घोषित करा’ या मागणीसाठी विश्व हिंदु परिषदेची स्वाक्षरी मोहीम !

गायीला राष्ट्रीय पशू घोषित करा, गोमातेला राष्ट्रमाता घोषित करा, संपूर्ण देशभरात एकच गोहत्या बंदी कायदा कठोरपणे लागू करा, महाराष्ट्रात गोहत्या बंदी कायदा अधिकाधिक कठोर करा, गोरक्षकांच्या संरक्षणासाठी आणि गोहत्याबंदी कायद्याची कार्यवाही होण्यासाठी…

आष्टा (सांगली) येथे गोरक्षकांनी धाड टाकून पकडले ३ टन गोवंशियांचे मांस : ५ जणांना अटक

या वेळी तेथे १५० लहान गोवंशियांनाही कापलेले आढळून आले. धाड टाकलेल्या ठिकाणी मुंडके, रक्त, मांस, अवयव, त्वचा पोलिसांनी कह्यात घेऊन त्याची विल्हेवाट लावली. या कारवाईत ५ जणांना अटक करण्यात आली आहे.

इंदापूर (पुणे) येथील धर्मांध पोलिसानेच पशूवधगृहातून सोडवून आणलेली ३१ गोवंशीय जनावरे कसायांना दिली !

गोरक्षण केल्यास गोरक्षकांवरच खोटे गुन्हे नोंद करण्याची धमकी

देशी गायींच्या संख्येत होत असलेली लक्षणीय घट चिंताजनक

वर्ष २०२० मध्ये एकूण गायीत भारतीय गायींची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली असून त्याविषयी चिंता करण्याचे तर कुणाच्या लक्षातही येतांना दिसत नाही.