अवैधरित्या गोवंशियांच्या मांसाची वाहतूक करणार्‍या धर्मांधांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केले ठाणे पोलिसांच्या स्वाधीन !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

ठाणे, २५ सप्टेंबर (वार्ता.) – अवैधरित्या गोवंशाच्या मांसाची वाहतूक करणार्‍या धर्मांधांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी कळवा खाडीपुलाजवळ पकडून ठाणे नगर पोलिसांच्या कह्यात दिले. त्यांच्याकडून गोमांसाने भरलेली स्विफ्ट गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. हे गोमांस पडघा येथून राबोडी येथे आणण्यात येणार होते. दुसर्‍या एका घटनेतही १० टन गोमांसाने भरलेला ट्रक नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पकडण्यात आल्याचे बजरंग दलाचे जिल्हासंयोजक सूरज तिवारी यांनी सांगितले. (राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांनाही त्याची कठोर कार्यवाही होत नसल्यामुळेच धर्मांध गोहत्या करत आहेत. – संपादक)

गोहत्येस उत्तरदायी असलेल्या मुख्य सूत्रधारांवर कारवाई करावी !

निवेदनाच्या माध्यमातून ठाणे पोलीस आयुक्तांकडे विश्व हिंदु परिषदेची मागणी !

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांना मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गोवंशियांची हत्या करून त्यांचे मांस मुसलमान वस्त्यांमध्ये विकले जाते. हिंदुत्वनिष्ठांनी गोमांस पकडून दिल्यावर वाहनचालक आणि वाहन यांवर केवळ कारवाई करण्यात येते. याविषयी विविध पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत; मात्र गोहत्येचे मूळ सूत्रधार मोकाट रहातात. त्यांच्यावर कडक कारवाई होत नसल्यामुळेच पुनःपुन्हा गोवंशियांची हत्या होत आहे. मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विश्व हिंदु परिषदेकडून निवेदनाच्या माध्यमातून पोलिसांकडे करण्यात आली.