१ नोव्हेंबर २०२१ या दिवशी ‘वसुबारस’ आहे. त्या निमित्ताने…
नव्या युगाचा हा नवा शंखध्वनी,
जागृत होऊनी कर्तव्य ते करूया ।
गोपालन अन् गोसंवर्धन करून,
राष्ट्र आपले उन्नत बनवूया ।। धृ. ।।
सोडून दिले गोपालन; म्हणून दशा आमची झाली दीनवाणी ।
गायींचीही दुर्गती झाली, सुपीक धरतीही गेली कोमेजूनी ।
झाले प्रदूषित अन्न, वायू अन् जल, मिळून आपण वाचवूया ।
गोपालन अन् गोसंवर्धन करून,
राष्ट्र आपले उन्नत बनवूया ।। १ ।।
करतात गोमातेचा जयजयकार;
पण गोहत्या मात्र चालूच राहिल्या ।
गोमय-गोमूत्राचे महत्त्व नाही जाणले,
लक्ष केवळ दुधाकडेच राहिले ।
रिते मोकळे अंगण-गोठा, चला आपण पुन्हा गोकुळ वसवूया ।
गोपालन अन् गोसंवर्धन करून,
राष्ट्र आपले उन्नत बनवूया ।। २ ।।
अथक श्रम आणि निढळाच्या घामाने,
दुर्बळता दूर सारूया ।
स्वतः संघटित होऊन, आपण सगळे गोसेवेत रमूया ।
पंचगव्याच्या पावित्र्याने, आपण नराचे नारायण होऊया ।
गोपालन अन् गोसंवर्धन करून,
राष्ट्र आपले उन्नत बनवूया ।। ३ ।।
उद्ध्वस्त गोशाळेचा जीर्णाेद्धार करण्या, आपण सगळे झटूया ।
प्रत्येक दुर्बळ पशूला आश्रय मिळावा, हा भाव हृदयी धरूया ।
‘गो-घट’ घरा-घरांत स्थापून, जगदंबेचा आशीर्वाद घेऊया ।
गोपालन अन् गोसंवर्धन करून,
राष्ट्र आपले उन्नत बनवूया ।। ४ ।।
ओसाड गावाचे होईल गोकुळ,
आनंदाने कुहू कुहू गायील कोकीळ ।
माळरानी उद्यान फुलेल अन् लाजेल
वसुंधरा नेसून हिरवा शालू ।
मातृभूमीला जगद्गुरु आणि
‘सोने की चिडिया’ पुन्हा आपण करूया ।
गोपालन अन् गोसंवर्धन करून,
राष्ट्र आपले उन्नत बनवूया ।। ५ ।।
– विमला अग्रवाल, शांतीकुंज, हरिद्वार
(साभार : सामाजिक संकेतस्थळ)