आवश्यकता भासल्यास अबकारी घोटाळ्याचे अन्वेषण दक्षात खात्याकडे सोपवणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत, गोवा

या घोटाळ्याची खात्याअंतर्गत चौकशी केल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी कुणाचीही गय केली जाणार नाही. दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

भ्रष्टाचाराचा आरोप करत ठाकरे गटाचा मुंबई महापालिकेवर मोर्चा !

महागनरपालिकेच्या कारभारामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली १ जुलै या दिवशी मुंबई महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला.

दिवास्‍वप्‍नच राहिलेला ‘भ्रष्‍टाचारमुक्‍त भारत’ !

प्रशासनातील भ्रष्‍टाचार पुन्‍हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. याकरता केवळ कायदे बनवून उपयोग नाही, तर समाजाची लोभी मानसिकता पालटण्‍याची आवश्‍यकता आहे. अन्‍यथा राजकीय घोषणांप्रमाणेच ‘भ्रष्‍टाचारमुक्‍त भारत’ हे दिवास्‍वप्‍नच राहील.

५०० कोटी रुपयांच्या बेहिशोबी रकमेच्या प्रकरणी ‘ईडी’च्या माजी अधिकार्‍याला ईडीकडून अटक !

अशा भ्रष्टाचार्‍यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी कायदा करणे आवश्यक आहे !

गोवा : अबकारी घोटाळा प्रकरणी कारकुनासह २ निरीक्षक सेवेतून निलंबित

खात्यांतर्गत अन्वेषण चालू करून संबंधित वरिष्ठ कारकुनाला ११ लाख रुपये भरण्यास भाग पाडण्यात आले, तर उर्वरित २८ लाख रुपये पुढील २ दिवसांत वसूल केले जाणार असल्याचे अबकारी सूत्रांनी सांगितले.

माजी नगरसेविका शुभदा पाटील आणि साहाय्‍यक पोलीस निरीक्षक राहुल राऊत यांना ५ दिवस पोलीस कोठडी !

या दोघांना कोल्‍हापूर पोलिसांनी सोलापूर येथून कह्यात घेतले आणि न्‍यायालयात उपस्‍थित केले. आत्‍महत्‍या करण्‍याच्‍या पूर्वी संतोष शिंदे यांनी लिहिलेल्‍या चिठ्ठीत पुण्‍यातील अन्‍य दोघांचीही नावे असून पोलीस या प्रकरणाचे अधिक अन्‍वेषण करत आहेत.

पाकव्याप्त काश्मीरमधील लोकच हा भाग भारतात विलीन करण्याची मागणी करतील ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह  

पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग आहे. येथील जनताही भारतात येऊ इच्छित आहे. भारताच्या संसदेने पाकव्याप्त काश्मीर भारतात विलीन करण्याचा प्रस्ताव संमत केला आहे.

तांदूळाच्‍या वाटपामध्‍ये केंद्र सरकार राजकारण करत आहे ! – सिद्धरामय्‍या, मुख्‍यमंत्री, कर्नाटक

‘भ्रष्‍टाचार म्‍हणजे शिष्‍टाचार ’ हे घोषवाक्‍य देऊन इंदिरा गांधींनी ते अमलात आणले. असे नेते असणार्‍या काँग्रेसच्‍या नेत्‍यांना हे बोलण्‍याचा अधिकार काय ?

माजी नगरसेविका आणि पोलीस अधिकारी यांवर १ कोटी रुपयांची खंडणी मागितल्‍याचा आरोप

संतोष शिंदे यांनी आत्‍महत्‍या करण्‍याच्‍या पूर्वी एक चिठ्ठी लिहिली असून त्‍यात १ कोटी रुपयांच्‍या खंडणीच्‍या प्रकरणी माजी नगरसेविका आणि एक पोलीस अधिकारी यांनी त्रास दिल्‍याचे नमूद केले आहे.

सिंधुदुर्ग : सावंतवाडी नगरपरिषदेत विकासाच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार !

या आरोपांच्या प्रकरणी तातडीने अन्वेषण करून दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक !