१५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना आरोग्य साहाय्यक रेवाळे याला पकडले

कोतवडे (रत्नागिरी) येथे लाचलुचपत विभागाची कारवाई !

रत्नागिरी – हॉटेल बांधकामाकरता आवश्यक असणारा आरोग्य विभागाकडील ‘ना हरकत’ दाखला देण्यासाठी १५ सहस्र रुपयांची लाच घेणार्‍या तालुक्यातील कोतवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य साहाय्यक शैलेश आत्माराम रेवाळे याला येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. ३१ ऑक्टोबर या दिवशी ही कारवाई करण्यात आली.

तक्रारदाराच्या मालकाच्या हॉटेल बांधकामाकरता आवश्यक असणारा आरोग्य विभागाकडील ‘ना हरकत’ दाखला मिळवण्याकरता तयार केलेला अर्ज स्वीकारण्यासाठी आणि या कामासाठीची प्रक्रिया पूर्ण करून ‘ना हरकत’ दाखला देण्यासाठी शैलेश रेवाळे याने २६ ऑक्टोबर २०२३ या दिवशी पंधरा सहस्र रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदाराच्या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रत्नागिरी कार्यालयाकडून  सापळा रचण्यात आला.


या प्रकरणी पोलीस निरीक्षक शहानवाज मुल्ला तपासी अधिकारी म्हणून काम पहात आहेत. ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक सुनील लोखंडे, अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर, सुधाकर सुराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांच्या पर्यवेक्षणाखालील पथकाने ही कामगिरी केली.

संपादकीय भूमिका

  • अशा भ्रष्टाचार्‍यांना तात्काळ कायद्यानुसार कठोर शिक्षा झाल्यासच अन्य कुणी अशी कृत्ये करण्यास धजावणार नाहीत !
  • अशा लाचखोरांसमवेत त्यांच्या कुटुंबियांचीही संपत्ती जप्त केली, तरच अशा प्रकारांना थोडा तरी आळा बसेल !