मुंबई – रेल्वेद्वारे मालाची देवाणघेवाण करण्याच्या कामात रेल्वेचे अधिकारी लाच घेत असल्याचे उघडकीस आले आहे. ७ आणि ८ नोव्हेंबर या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे केंद्रीय अन्वेषण विभागाने घातलेल्या धाडीमध्ये हा भ्रष्टाचार उघड झाला असून या प्रकरणी रेल्वेच्या १२ अधिकार्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
१. लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणार्या मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या डब्यांमधून देशातील विविध राज्यांमध्ये माल पाठवला जातो. यासाठी रेल्वेचे कर्मचारी आणि खासगी आस्थापनांचे कर्मचारी काम करतात. माल भरण्यासाठी रेल्वेकडून ३ घंटे इतका कालावधी दिला जातो. त्याहून अधिक वेळ लागल्यास अतिरिक्त शुल्क आकारले जाते. यामध्ये रेल्वेचे अधिकारी अतिरिक्त वेळेचे शुल्क न आकारण्यासाठी खासगी आस्थापनाकडून लाच घेत असल्याचे आढळून आले.
२. या प्रकरणी यार्डचे मुख्याधिकारी प्रणय मुकुंद, उपस्टेशन मास्तर गिरधारीलाल सैनी, प्रदीप गौतम, जयंत मौर्या, व्यवस्थापक मिताईलाल यादव, राकेश करांडे, पॉईंटमन मिथिलेश कुमार, रौनित राज यांसह अन्य ४ अधिकार्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मालाचे वजन अल्प दाखवण्यासाठीही अधिकारी लाच स्वीकारत असल्याचे आढळून आले.
३. या प्रकरणी पार्सल विभागाचे मुख्य अधीक्षक जे.व्ही. देशपांडे यांनी वर्षभरात ८ लाख रुपये इतकी, तर अन्य एका अधिकार्याने ५ लाख १८ सहस्र रुपये इतकी लाच घेतल्याचे आढळून आले. या प्रकरणीही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिका
|