आदल्या दिवशी लाच न घेण्याची शपथ, तर दुसर्या दिवशी लाच घेतली
नाशिक – दक्षता अभियानांतर्गत ८ नोव्हेंबर या दिवशी लाच न घेण्याची शपथ घेणार्या निफाड येथील साहाय्यक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी राजेश शंकर ढवळे याला ९ नोव्हेंबर या दिवशी १ लाख रुपयांची लाच घेतांना अटक करण्यात आली. ढवळे हा वर्ग-१ चा अधिकारी आहे. त्याचे वेतन ७५ सहस्र रुपये आहे. तरीही पैशाच्या हव्यासापोटी तो लाच घेत होता. ६ मासांपूर्वी याच कार्यालयातील निबंधक रणजित पाटील यालाही २० सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक झाली होती.
(शासनाकडून भरघोस वेतन, रहाण्यासाठी घरे आणि इतर सुविधा असतांनाही लाच घेणार्या अशा अधिकार्यांची सर्व संपत्ती जप्त केली पाहिजे ! – संपादक)
निफाड येथील एका सावकाराच्या विरोधात एका व्यक्तीने साहाय्यक निबंधक कार्यालयात तक्रार दिली होती. संबंधित सावकाराच्या विरोधात वरिष्ठ अधिकार्यांना अहवाल पाठवण्यासाठी ढवळे याने दीड लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती १ लाख रुपये द्यायचे ठरले. त्या विरोधात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार पथकाने सारडा सर्कल येथील दुय्यम निबंधक कार्यालयात सापळा रचला. तक्रारदाराकडून १ लाख रुपये घेतांना ढवळे याला रंगेहाथ पकडण्यात आले.
संपादकीय भूमिका
|