सियालकोट (पाकिस्तान) येथे २ मुसलमानांकडून ख्रिस्ती कामगाराची हत्या

मुसलमानबहुल देशात अल्पसंख्य हिंदू, ख्रिस्ती आदी धर्मियांच्या सातत्याने हत्या कशा होतात ?, असा प्रश्‍न ‘भारतातील अल्पसंख्य समाज धोक्यात आहे’, असा अहवाल प्रसिद्ध करणार्‍या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांना कसा पडत नाही ?

वडोदरा (गुजरात) येथे ख्रिस्ती तरुणाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार

आता ख्रिस्ती तरुणही मुसलमान तरुणांप्रमाणे हिंदु तरुणींची फसवणूक करत आहेत, असे समजायचे का ?

गोव्यात हिंदूंचे धर्मांतर १०० दिवसांत बंद केले ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

गेल्या दशकभरात ‘बिलिव्हर्स’ने सुमारे १ लाख ५० सहस्र हिंदूंचे धर्मांतर केल्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर धर्मांतराच्या विरोधात कठोरतेने पावले उचलल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे गोव्यातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आभार व्यक्त केले आहेत.

केरळमध्ये येशू ख्रिस्ताविषयी अपमानास्पद टिप्पणी करणार्‍या मौलवीच्या विरोधात गुन्हा नोंद

साम्यवाद्यांच्या राज्यात ख्रिस्ती किंवा मुसलमान यांच्या धार्मिक भावना दुखावल्यावर तेथील पोलीस तात्काळ त्याची नोंद घेतात; मात्र हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यावर वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष करतात, हे लक्षात घ्या !

गेल्या ५ वर्षांत किमान २० लाख ऑस्ट्रेलियन लोकांनी त्यागला ख्रिस्ती धर्म !

तब्बल ९ टक्के लोक झाले नास्तिक, बहुतांश लोक ख्रिस्ती पंथातील !
१.१ टक्क्यांनी वाढली हिंदूंची लोकसंख्या !

हिंदु धर्माखेरीज अन्य कोणत्याही धर्माला इतक्या मोठ्या प्रमाणात कलंकित केले जात नाही ! – मारिया वर्थ, हिंदु धर्माच्या अभ्यासक आणि विचारवंत

हिंदु धर्म हा केवळ विश्वासावर नाही, तर ज्ञानावर आधारीत आहे. आमच्यासह जगाविषयी काय सत्य आहे, याचा खरोखरचा शोध या धर्मात घेतला आहे. ज्याला काही अर्थ नाही आणि ज्याची पडताळणी करता येत नाही, अशांवर विश्वास ठेवण्याची हिंदूंना आवश्यकता नाही. त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे.

सागर (मध्यप्रदेश) येथे भाजपच्या ख्रिस्ती नेत्याने स्वीकारला हिंदु धर्म !

विविन यांनी हिंदु धर्म स्वीकारल्याच्या विधीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित करण्यात आला आहे. त्यात ते ‘मला हिंदु धर्म आवडतो. माझे पूर्वजही हिंदु होते. यामुळेच मी हिंदु धर्म स्वीकारला आहे’, असे म्हणतांना दिसत आहेत.

बिलिव्हर्सचा पास्टर (पाद्री) डॉम्निक यांना गाडीच्या रस्ताकरात दिलेली ३ लक्ष रुपयांची सूट भरण्याचा वाहतूक खात्याचा आदेश

पास्टर डॉम्निक यांनी मर्सिडीज गाडी व्यक्तीगत कामासाठी वापरली आणि त्यामुळे रस्ताकराच्या शुल्कात दिलेली सूट अनधिकृत ठरते. रस्ताकरात सूट कोणत्या आधारे दिली याची चौकशी होऊन तत्कालीन उत्तरदायींवरही कारवाई व्हायला हवी !

आंध्रप्रदेश सरकारच्या ड्रोन वैमानिक प्रशिक्षण योजनेसाठी केवळ मुसलमान आणि ख्रिस्ती तरुणांची निवड !

कुठल्या राज्याने असे प्रशिक्षण केवळ हिंदूंसाठी ठेवले असते, तर आतापर्यंत प्रसारमाध्यमे, पुरोगाम्यांनी आदींनी आकाश-पाताळ एक केले असते ! आता हे सर्व गप्प का ?

ख्रिस्ती मिशनऱ्यांकडून चालवण्यात येणाऱ्या ‘विद्यामाता हायस्कूल’ची मान्यता रहित करा ! – दादा कांबळे, जिल्हा सचिव, मनसे

हिंदूंना लुबाडणार्‍या आणि त्यांच्या पाल्यांना ‘जन्महिंदू’ बनवणार्‍या ख्रिस्ती शाळांवर बहिष्कार टाका !