वडोदरा (गुजरात) येथे ख्रिस्ती तरुणाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार

वडोदरा (गुजरात) – येथे एका हिंदु तरुणीला सेल्विन नावाच्या ख्रिस्ती तरुणाने प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला पळवून नेऊन तिच्याशी विवाह केला. नंतर तिच्यावर अत्याचार केले. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सेल्विन याने या तरुणीवर गेल्या काही मासांत अत्याचार करतांना ब्लेडद्वारे ५०० हून अधिक वार केले. या तरुणीचे वडील बांधकाम व्यावसायिक आहेत. ते म्हणाले, ‘‘माझ्या मुलीच्या संदर्भात जे घडले, तसे अन्य कुणाच्याही मुलीच्या संदर्भात घडू नये.’’

सेल्विन केवळ १० वी उत्तीर्ण होता; मात्र त्याने या तरुणीला तो २५० कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक असल्याचे सांगून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर तिला एका हॉटेलवर नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध निर्माण करून त्याची छायाचित्रे काढली. त्या छायाचित्रांद्वारे तो तिला ब्लॅकमेल करू लागला. त्यानंतर सप्टेंबर २०१९ मध्ये त्याने या तरुणीला पळवून नेऊन लग्न केले. तो सतत २ वर्षे तिच्यावर अत्याचार करत होता. यानंतर या तरुणीने तिच्या पालकांना याविषयी सांगितल्यावर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली.

संपादकीय भूमिका 

आता ख्रिस्ती तरुणही मुसलमान तरुणांप्रमाणे हिंदु तरुणींची फसवणूक करत आहेत, असे समजायचे का ?