ख्रिस्ती मिशनऱ्यांकडून चालवण्यात येणाऱ्या ‘विद्यामाता हायस्कूल’ची मान्यता रहित करा ! – दादा कांबळे, जिल्हा सचिव, मनसे

हायस्कूलमध्ये चढ्या दराने शालेय साहित्याची विक्री होत असल्याचे प्रकरण

धाराशिव, २२ जून (वार्ता.) – शहरातील ख्रिस्ती मिशनऱ्यांकडून चालवण्यात येणाऱ्या ‘विद्यामाता हायस्कूल’मध्ये चढ्या दराने शालेय साहित्याची विक्री होत असल्याची तक्रार मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी गटशिक्षणाधिकारी संजीव बागल यांच्याकडे पुराव्यांसह प्रविष्ट केली आहे. यामध्ये दादा कांबळे यांनी प्राथमिक  शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ‘विद्यामाता हायस्कूल’ची मान्यता रहित करण्याची शिफारस लातूर उपसंचालक कार्यालयाकडे करावी, अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी मनसेच्या वतीने शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे देण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की,

१. ‘विद्यामाता हायस्कूल’मध्ये चढ्या दराने पुस्तके, वह्या, गणवेश, बूट आदी साहित्य दुप्पट किमतीने विक्री केले जात होते. अनेक पालकांनी मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर १५ जून या दिवशी विद्यामाता हायस्कूल येथे जाऊन शालेय साहित्य विक्री चालू असलेला ‘व्हिडिओ’ प्रसारित केल्यानंतर शालेय साहित्य विक्री बंद केली होती.

२. गटशिक्षण अधिकारी संजीव बागल यांच्याकडे तक्रार दिल्यानंतर त्यांच्यासह विस्तार अधिकारी हाके मॅडम यांनी विद्यामाता हायस्कूल येथे जाऊन शालेय साहित्य विक्री करत असलेल्या ठिकाणाची पहाणी केली आणि शाळेला लेखी स्वरूपाचे म्हणणे सादर करण्यात यावे, असे आदेश दिले होते; मात्र विद्यामाता हायस्कूल येथे पुन्हा राजरोसपणे शालेय साहित्याची विक्री चालू आहे.

संपादकीय भूमिका

  • अशी मागणी का करावी लागते ? शिक्षणाधिकाऱ्यांच्या ते लक्षात येत नाही का ?
  • हिंदूंना लुबाडणार्‍या आणि त्यांच्या पाल्यांना ‘जन्महिंदू’ बनवणार्‍या ख्रिस्ती शाळांवर बहिष्कार टाका !