गेल्या ५ वर्षांत किमान २० लाख ऑस्ट्रेलियन लोकांनी त्यागला ख्रिस्ती धर्म !

  • तब्बल ९ टक्के लोक झाले नास्तिक, बहुतांश लोक ख्रिस्ती पंथातील !

  • १.१ टक्क्यांनी वाढली हिंदूंची लोकसंख्या !

कॅनबेरा (ऑस्ट्रेलिया) – ख्रिस्तीबहुल असलेल्या ऑस्ट्रेलियातील नागरिक आता ख्रिस्ती धर्माकडे पाठ फिरवत आहेत. एकेकाळी तब्बल ९० टक्के ऑस्ट्रेलियन नागरिकांचा धर्म हा ख्रिस्ती होता; परंतु आज त्यांची संख्या अर्ध्याहूनही खाली आली आहे. प्रत्येक ५ वर्षांनी येथे जनगणना केली जाते. वर्ष २०२१ च्या जनगणनेनुसार ऑस्ट्रलियात आता केवळ ४४ टक्के ख्रिस्ती शिल्लक राहिले आहेत. तर याच कालावधीत नास्तिक लोकांची संख्या ही तब्बल ९ टक्क्यांनी वाढली आहे. याचा सरळ सरळ अर्थ आहे की, ९ टक्के नागरिकांनी ख्रिस्ती धर्माचा त्याग केला आहे. एकूण लोकसंख्येतील हे प्रमाण पाहिले, तर ते किमान २० लाख आहे.

हिंदूबहुल भारतामध्ये जरी त्यांच्या विरोधात रचण्यात येणार्‍या षड्यंत्रांमुळे हिंदूंची लोकसंख्या न्यून होत असली, तरी ऑस्ट्रेलियामध्ये मात्र हिंदूंची संख्या झपाट्याने वाढत आहे. वर्ष २०१६ मध्ये १.९ टक्के असलेले हिंदू वर्ष २०२१ मध्ये ३ टक्क्यांवर पोचले आहेत. यामागील मुख्य कारण म्हणजे अनेक हिंदू भारतातून ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक होत आहेत.

१. वर्ष २०२१ च्या जनगणनेनुसार ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या आता २ कोटी ५५ लाख झाली आहे.

२. ४४ टक्के ख्रिस्ती, ३९ टक्के नास्तिक, ३ टक्के हिंदू, ३ टक्के मुसलमान, तर अन्य धर्मीय १ टक्का अशा प्रकारे धर्मनिहाय लोकसंख्येचे ऑस्ट्रेलियातील प्रमाण आहे.

३. ऑस्ट्रेलियामध्ये रहाणार्‍या लोकांमध्ये सर्वाधिक लोक असे आहेत, ज्यांचा जन्म ऑस्ट्रेलियात झाला आहे. त्यानंतर इंग्लंड आणि भारत या देशांत जन्म घेणारे अन् आता ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेल्यांचा क्रमांक लागतो.

संपादकीय भूमिका

  • युरोप आणि अमेरिका यांनंतर आता ऑस्ट्रेलियातही लक्षावधी ख्रिस्ती हे त्यांच्या धर्माचा त्याग करत आहेत. यातून त्यांच्या धर्मातील शिकवणीसंदर्भात कुणी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केल्यास चूक ते काय ?
  • भारतातील भोळ्याभाबड्या हिंदूंचे येनकेन प्रकारेण धर्मांतर करणार्‍या ख्रिस्त्यांना ऑस्ट्रेलियासारख्या देशांची उदाहरणे दाखवून त्यांना जाब विचारणे आवश्यक !
  • हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी आता हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासमवेतच त्यांना ख्रिस्ती धर्माची विदेशात वाढणारी अनास्थाही लक्षात आणून द्यावी !