भाजपची टीका
अमरावती (आंध्रप्रदेश) – आंध्रप्रदेशमधील जगन मोहन रेड्डी सरकारने चालू केलेल्या ड्रोन वैमानिक प्रशिक्षण योजनेत केवळ मुसलमान आणि ख्रिस्ती या धर्मांतील लोकांनाच प्रशिक्षण देण्यात येत आहे. यावर भाजपचे राज्याचे सरचिटणीस विष्णु वर्धन रेड्डी यांनी टीका केली आहे.
‘ईसाइयों और मुस्लिमों को फ्री ड्रोन पायलट ट्रेनिंग और प्लेसमेंट’: आंध्र प्रदेश के मुख्यमंत्री जगन रेड्डी की एक और तुष्टिकरण योजना, बीजेपी नेता ने शेयर किया पोस्टर#AndhraPradesh https://t.co/AzSK9MiBQu
— ऑपइंडिया (@OpIndia_in) June 23, 2022
१. विष्णु वर्धन रेड्डी यांनी ट्वीट करून एक ‘पोस्टर’ प्रसारित केले आहे. यामध्ये राज्यात ‘ड्रोन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी’कडून एका अभ्यासक्रमाची माहिती देण्यात आली आहे. यात केवळ मुसलमान आणि ख्रिस्ती उमेदवारांनाच प्रशिक्षण आणि नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या ‘पोस्टर’वर मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचे छायाचित्र आहे.
२. विष्णु वर्धन रेड्डी यांनी म्हटले आहे की, साधनांवर सर्वांचा समान अधिकार आहे, तरीही आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी केवळ २ धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठीच प्रशिक्षण का आयोजित केले आहे ? यामुळे धार्मिक तणाव निर्माण होऊ शकतो. आंध्रप्रदेश सरकार आमच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात घाणेरडे राजकारण करत आहे. त्यांनी हा निर्णय मागे घेतला पाहिजे.
संपादकीय भूमिका
|