(म्‍हणे) ‘जयदीप आपटे हा ‘सनातन प्रभात’शी कसा संबंधित आहे ?, हे त्‍याच्‍या मुलाखतीवरून स्‍पष्‍ट झाले !’ : सुषमा अंधारे

निवळ मुलाखत प्रसिद्ध केली; म्‍हणून मूर्तीकार आणि सनातन प्रभात यांचा संबंध जोडून वृत्तपत्रावर आगपाखड करणे, हे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण आहे !

गौरव मर्दानी खेळांचा !

समाजाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यास साहाय्यभूत असणार्‍या या मर्दानी खेळाचा गौरव खर्‍या अर्थाने तेव्हाच होईल, जेव्हा बहुसंख्य हिंदु युवक युवती त्यांच्या दैनंदिन जीवनात याचा अंगीकार करून त्यांच्यात लढाऊवृत्ती बाणवतील !

पत्रकार परिषदेत पत्रकारांकडून मंत्री दीपक केसरकर यांच्यावर प्रश्‍नांची सरबत्ती !

मंत्री केसरकर म्हणाले की, ‘वाईटातून चांगले होईल’, या माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. महाराजांचा पुतळा पडला ही अत्यंत दु:खदायक घटना घडली आहे.

राजकोट किल्‍ल्‍यावर ठाकरे आणि राणे यांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्‍याने वातावरण तणावग्रस्‍त

शहरातील राजकोट किल्‍ल्‍यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्‍यानंतर त्‍यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधी पक्षांच्‍या महाविकास आघाडीने मालवण बंद घोषित केला होता. त्‍यानिमित्ताने येथे आलेल्‍या महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांनी राजकोट किल्‍ल्‍याला भेट देऊन तेथील स्‍थितीचा आढावा घेतला.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed : शिल्‍पकार आणि संरचनात्‍मक सल्लागार यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा नोंद !

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्‍याचे प्रकरण
बांधकाम निकृष्‍ट दर्जाचे असल्‍याची टीका

Raj Thackeray : महापुरुषांचे पुतळे आणि स्मारके, ही केवळ राजकीय सोय बनली आहे ! – राज ठाकरे

राज ठाकरे पुढे म्हणाले की, मालवण येथील राजकोट गडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा पडल्याची बातमी मनाला वेदना देणारी आहे.

राजकोट (जिल्‍हा सिंधुदुर्ग) येथे नव्‍याने उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला !

९ महिन्‍यांपूर्वी बांधलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा पडतो, याचा अर्थ त्‍याचे काम निकृष्‍ट दर्जाचे होते, असाच होतो. यास उत्तरदायी असणार्‍यांना शिक्षा करा !

धर्म, अधर्म आणि सद्यःस्थितीत हिंदु धर्माचे रक्षण !

जर मनुष्य धर्माने वागला नाही आणि तो अधर्म करू लागला, तर विनाश घडतो, असे या ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या दोन्ही ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या चरित्रांतून दर्शवण्यात आले आहे. धर्माद्वारे अधर्मावर कशी मात करायची आणि धर्मरक्षण कसे करायचे, हे या दोन्हींमध्ये सांगण्यात आले आहे…

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : बदलापूर येथील नराधमाचे हातपाय कापून चौरंगा करावा !; भाजपला संपवणे हाच मविआचा कार्यक्रम ! – मुनगंटीवार, वनमंत्री…

महाराजांनी राझांचा पाटील याचे हात पाय कापून जसा चौरंग केला होता, तसेच याविषयी केले पाहिजे, असे मत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी यवतमाळ येथील सभेत व्यक्त केले.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी सरकारने ‘राष्ट्रीय सुट्टी’ घोषित करण्याविषयीची मोहीम

या मोहिमेला प्रत्येक भारतीय नागरिकाने मत देऊन पाठिंबा द्यावा. यासाठी www.voteforshivajijayanti.com अथवा www.shivajimaharajfoundation.com या संकेतस्थळाला भेट देऊन त्यावर मत नोंदवता येईल.