पुणे येथील डुल्या मारुति मंदिरात चोरीची घटना घडूनही अद्याप तक्रार नोंद नाही

हिंदूंची असुरक्षित मंदिरे !

पुणे येथील गणेश पेठेतील डुल्या मारुति

पुणे, २२ मार्च – येथील गणेश पेठेतील डुल्या मारुति मंदिरात दर्शन घेण्याचे निमित्त करून ‘मास्क’ घालून आलेल्या अज्ञात चोराने दानपेटीतील रोकड चोरून नेली. चोरीचा हा प्रकार मंदिरातील सीसीटीव्ही छायाचित्रकात चित्रीत झाला आहे. २ फेब्रुवारी या दिवशी ही घटना घडल्याचे देवस्थानच्या विश्‍वस्तांनी सांगितले, तर या प्रकरणी अद्याप पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. चोर अनुमाने अर्धा घंटा मंदिरात होता; मात्र अद्याप किती रोकड दानपेटीतून चोरीला गेली, हे समजू शकले नाही.