सनातन संस्थेच्या साधकांनी ‘जे के योग’चे प्रवर्तक स्वामी मुकुंदानंदजी यांची घेतली सदिच्छा भेट !

तुलसी भवनामध्ये स्वामी मुकुंदानंदजी यांचे ५ दिवस प्रवचनांचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्यांची भेट घेण्यात आली. याप्रसंगी स्वामी मुकुंदानंदजी यांनी सनातनच्या कार्याचे कौतुक केले आणि संस्थेच्या कार्याला आशीर्वाद दिले.

समाजातील संतांना सनातन संस्था ‘आपली’ का वाटते ?

परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा आणि शिकवण यांमुळे त्यांच्यासारखेच गुण सनातनचे संत आणि साधक यांच्यातही निर्माण झाले आहेत. या गुणांमुळे आता त्यांचेही समाजातील संतांशी आपुलकीचे नातेबंध निर्माण होत आहेत.

संत आणि मान्यवर यांनी जाणलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अवतारत्व !

पूर्वीपासूनच समाजातील संत आणि अध्यात्मातील अधिकारी व्यक्ती यांनी परात्पर गुरु डॉक्टरांची अवतारी वैशिष्ट्ये जाणली होती. सूर्य उगवल्याचे सर्वांना सांगावे लागत नाही, ते आपोआपच कळते, तसेच परात्पर गुरु डॉक्टरांच्या अवतारत्वाची अनुभूती सर्वांना येते !

सनातनच्या ग्रंथांविषयी संतांनी काढलेले गौरवोद्गार !

‘सनातनच्या ग्रंथांमध्ये वेद, उपनिषदे, गीता अन् संतसाहित्य यांची तत्सम प्रमाणवचने घेतल्यामुळे ते विचार अधिक प्रभावी ठरतात.’ – प.पू. डॉ. वासुदेव गिंडे, बेळगाव

हिंदु जनजागृती समितीचा हिंदु संस्कृतीच्या प्रसाराचा प्रयत्न स्तुत्य !  महामंडलेश्‍वर पतित पावनदास महाराज

येथे लावण्यात आलेल्या ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र जागृती केंद्रा’ला महामंडलेश्‍वर पतित पावनदास महाराज यांनी भेट दिली. त्या वेळी ते मार्गदर्शन करत होते.

हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांच्या विरोधात जागृती करण्याची आवश्यकता ! – महामंडलेश्‍वर बालयोगी आचार्य श्री स्वामी सत्यात्मानंद गिरिजी महाराज

हिंदूंच्या अनेक संस्था असल्या, तरी समाजात जाऊन लोकांना जागृत करून त्यांना संघटित करणे आवश्यक ! देशात सहस्रो पशूवधगृहे असून त्यांचा विरोध करायला हवा.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोहम् आश्रमाचे स्वामी सत्यानंद महाराज यांची घेण्यात आली भेट !

समितीचे श्री. सुनील घनवट आणि श्री. हरिकृष्ण शर्मा यांनी सोहम् आश्रमाचे स्वामी सत्यानंद महाराज यांची भेट घेतली. या वेळी श्री. घनवट यांनी महाराजांना समितीच्या कार्याविषयी माहिती दिली.

हिंदु राष्ट्राच्या कार्यात मी तुमच्या समवेत आहे ! – श्री महंत स्वामी कृष्णानंद महाराज, श्री आनंदाश्रम, हरिद्वार

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात सर्वांनी संघटित होण्याची आवश्यकता आहे. या कार्यात मी तुमच्या समवेत आहे. सर्व संत एकत्रित प्रयत्न करूया, असे प्रतिपादन श्री महंत स्वामी कृष्णानंद महाराज यांनी केले.

हिंदु जनजागृती समिती साधूसंतांचे कार्य करत आहे ! – स्वामी सुरेशदास महाराज

भगवी वस्त्रे घालून साधूसंत जे कार्य करत आहेत, तेच कार्य हिंदु जनजागृती समिती करत आहे. तुमचे कार्य अनुकरणीय आहे. समितीच्या कार्याला माझे नेहमी सहकार्य राहील, असे गौरवोेद्गार स्वामी सुरेशदास महाराज यांनी येथे काढले.

प्रत्येक सरकार हिंदुत्वाच्या नावावर केवळ मतपेटी बनवत आहे ! – स्वामी कल्याण देव महाराज

कोणतेही सरकार हिंदुत्वाच्या नावावर केवळ मतपेटी बनवत आहे. हिंदु संस्कृतीवर कोणता आघात झाला, तर सर्व साधूसंतानी एकत्र येऊन विरोध केला पाहिजे, तरच हे राष्ट्र ‘हिंदु राष्ट्र’ होऊ शकते.