सनातन संस्थेच्या साधकांनी ‘जे के योग’चे प्रवर्तक स्वामी मुकुंदानंदजी यांची घेतली सदिच्छा भेट !

स्वामी मुकुंदानंदजी

जमशेदपूर (झारखंड) – जगद्गुरु कृपालुजी महाराज यांचे ज्येष्ठ प्रचारक, ‘जे के योग’चे प्रवर्तक तथा विश्वप्रसिद्ध प्रेरक वक्ते स्वामी मुकुंदानंदजी यांची सनातन संस्थेचे साधक श्री. बी.व्ही. कृष्णा आणि श्री. आलोक पांडेय यांनी सदिच्छा भेट घेतली. या वेळी साधकांनी स्वामीजींना सनातन संस्थेचा कार्याचा परिचय करून दिला आणि त्यांना सनातनचे ग्रंथ भेट स्वरूपात देण्यात आले.

येथील तुलसी भवनामध्ये १० ते १४ मार्च या कालावधीत स्वामी मुकुंदानंदजी यांचे ५ दिवस प्रवचनांचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्यांची भेट घेण्यात आली. याप्रसंगी स्वामी मुकुंदानंदजी यांनी सनातनच्या कार्याचे कौतुक केले आणि संस्थेच्या कार्याला आशीर्वाद दिले.