भोकरदन (छत्रपती संभाजीनगर) येथील ३ औषधालय चालकांना अटक !

गर्भवतीची दलालाच्या वतीने गर्भलिंग चाचणी करून गर्भपात केल्याच्या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात नोंद केलेल्या गुन्ह्यात भोकरदन तालुक्यातील ३ औषधालय चालकांना अटक करण्यात आली.

सांगली येथे बनावट नोटांप्रकरणी मिरज येथील एका धर्मांधाला अटक !

बनावट नोटा निर्माण करून त्या समाजात वितरित करणार्‍या धर्मांधांच्या मागे असलेल्या आंतरराष्ट्रीय अदृश्य हातापर्यंत पोचले पाहिजे !

सातारा येथे रेल्वे पोलिसावर आक्रमण करणार्‍या तिघांना अटक !

सातारा रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक ३ वर मद्य पिणार्‍या तिघांना लोहमार्ग रेल्वे पोलीस कर्मचारी श्रीरंग शिंदे यांनी अटकाव केला असता त्यांच्यावर तिघांनी दगडाने जीवघेणे आक्रमण केले आहे.

एकतर्फी प्रेमातून अन्य धर्मीय तरुणीची अश्‍लील छायाचित्रे सामाजिक माध्यमांतून प्रसारित करणार्‍या आफ्रिद याला अटक

धर्मांध मुसलमान तरुण अन्य धर्मीय तरुणींवर प्रेम नाही, तर धर्माच्या आधारे जिहाद करतात, हे लक्षात घ्या !

मुंबईमध्ये अतिक्रमण हटवणार्‍या अधिकार्‍यांवर दगडफेकप्रकरणी ५७ जणांना अटक !

पवई येथील हिरानंदानी भागातील अनधिकृत झोपडपट्टयांवर कारवाईसाठी गेलेले मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि पोलीस यांवर दगडफेक केल्याप्रकरणी पोलिसांनी ५७ जणांना अटक केली आहे. यासह १५ जणांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

ईश्वरपूर येथे गोवंशियांचा छळ केल्याच्या प्रकरणी दोघांना अटक !

गोवंश हत्याबंदी कायद्याच्या प्रभावी कार्यवाहीची आवश्यकता यातून स्पष्ट होते !

खोट्या आरोपाखाली अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना भोगावा लागला होता कारावास !

२ जून या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘कारावासातील अनुभवामुळे ईश्वरावरील श्रद्धा वृद्धींगत, दुखावलेल्या अधिकार्‍यांकडून अडकवण्याचा प्रयत्न’, ही सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत. (उत्तरार्ध)

‘सीबीआय’ने षड्यंत्रात गोवलेले विक्रम भावे !

वर्ष २०१३ मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. दाभोलकर यांची हत्या झाली. या प्रकरणात आरोपी केलेल्या अधिवक्ता संजीव पुनाळेकर, विक्रम भावे आणि डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांची पुण्याच्या विशेष ‘सीबीआय’ न्यायालयाने १० मे या दिवशी निर्दाेष मुक्तता केली. या पार्श्वभूमीवर ‘आकार डीजी-९’ या यू ट्यूब वाहिनीचे संपादक श्री. प्रभाकर सूर्यवंशी यांनी अधिवक्ता संजीव पुनाळेकर, श्री. विक्रम भावे आणि या खटल्यातील अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्याशी संवाद साधला. त्यातील श्री. विक्रम भावे यांचे अनुभव वाचकांसाठी देत आहोत.

Denmark Prime Minister Attacked : डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांना धक्काबुक्की !

पोलिसांनी धक्काबुक्की करणार्‍याला अटक केली आहे.

Chinese national Arrested : भारतात घुसलेल्या चिनी नागरिकाला अटक !

पाकिस्तानी आणि बांगलादेशी यांच्यानंतर आता चिनी नागरिकांचीही भारतात घुसखोरी होत असेल, तर ते सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर आहे, हे लक्षात घ्या !