गोवंशीय आणि टेंपो मिळून ११ लाख ७५ सहस्र रुपयांचा माल जप्त !
ईश्वरपूर (सांगली) – येथे जनावरांची कत्तल करण्याच्या उद्देशाने पत्र्याच्या शेडमध्ये आणि टेंपोत १८ गोवंशियांना कोणताही चारापाणी न देता डांबून ठेवून त्यांचा अमानुषपणे छळ करण्यात आला. या प्रकरणी दुर्गेश जाधव आणि सचिन साळुंखे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या दोघांना अटक केली आहे. याविषयी पोलीस हवालदार प्रदीप पाटील यांनी तक्रार दिली आहे.
पेठ येथील सचिन साळुंखे याने पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीसाठी गोवंशियांना विक्रीसाठी आणल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पथक सिद्ध करून ६ जून या दिवशी सकाळी पत्र्याच्या शेडमध्ये जाऊन कारवाई केली. तेथे दुर्गेश जाधव हा टेंपोसह आढळला. त्यामध्ये ४ गोवंशीय आणि पत्र्याच्या शेडमध्ये १४ गोवंशीय असे एकूण १८ गोवंशीय आढळले. पोलिसांनी १० लाख रुपयांचा टेंपो, १ लाख ७५ सहस्र रुपयांचा गोवंश कह्यात घेतला.
संपादकीय भूमिकागोवंश हत्याबंदी कायद्याच्या प्रभावी कार्यवाहीची आवश्यकता यातून स्पष्ट होते ! |