Denmark Prime Minister Attacked : डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांना धक्काबुक्की !

डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन

कोपनहेगन (डेन्मार्क) – येथे एका व्यक्तीने डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांना जोरात धक्काबुक्की केली. यामुळे त्या अडखळल्या. पोलिसांनी धक्काबुक्की करणार्‍याला अटक केली आहे. युरोपियन युनियनच्या निवडणुकीमध्ये पंतप्रधान फ्रेडरिक्सन प्रचार करत असतांना ही घटना घडली.

अलीकडच्या काही दिवसांत युरोपियन युनियनमधील राजकारण्यांवरील हिंसक आक्रमणांत वाढ झाली आहे. ४ जून या दिवशी जर्मनीमध्ये एका राजकारण्याची हत्या करण्यात आली होती. जर्मनीच्या युरोपियन संसदेचे उमेदवार मॅथियास एके यांच्यावरही आक्रमण करण्यात आले. १५ मे या दिवशी युरोपमधील स्लोव्हाकिया देशाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावरही जीवघेणे आक्रमण झाले होते.