पुणे येथे किरकोळ वादातून भरदिवसा रस्त्यात कोयत्याने वार करून तरुणाची हत्या

औद्योगिक वसाहत चाकण परिसरातील म्हाळुंगे येथे आस्थापनात पाणीपुरवठा करण्याच्या वादातून भरदिवसा रस्त्यात ६ जणांनी मिळून कोयत्याने वार करून हत्या केली.

नागपूर गुन्हे शाखा पोलिसांकडून एकाच वेळी शहरातील ८६ ठिकाणी धाडी !

शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ७ घंट्यांत शहरातील ८६ ठिकाणी धाडी टाकल्या. या कारवाईत १३ लाख रुपयांची ‘एम्.डी. ड्रग्स’, ७.८ लाख रुपयांचा चरस आणि अडीच किलो गांजा जप्त करण्यात आला आहे, तसेच या कारवाईत २२ जणांना अटक करण्यात आली आहे. 

अशांसाठीही आता ‘लस’ हवी !

नारदा घोटाळ्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेले बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारमधील २ मंत्री फिरहाद हकीम आणि सुब्रत मुखर्जी, तसेच आमदार मदन मित्रा यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

पुणे येथे गोरक्षकासह त्याच्या मित्रांना मारहाण करणार्‍या ३ धर्मांधांना अटक

बेवारस गायी-गुरांची सेवा करणारे बद्रीनाथ पार्थसारथी या गोरक्षकासह त्याच्या मित्रांना ३ धर्मांधांनी रॉडसह लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी शाहबाज कुरेशी, अफजल कुरेशी आणि हसीना कुरेशी यांना अटक केली आहे.

बेंगळुरूमध्ये रेमडेसिविरच्या रिकाम्या कुपीमध्ये ग्लुकोज भरून विक्री करणार्‍या एका डॉक्टरसह वॉर्डबॉयला अटक

शहरात नकली रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री करणारे खासगी रुग्णालयाचे डॉ. सागर आणि वॉर्डबॉय कृष्णा यांना पोलिसांनी अटक केली आहे. अर्धेच इंजेक्शन रुग्णांसाठी वापरून उरलेले काळ्या बाजारात विकत होते.

निवृत्त भूमी अभिलेख अधिकार्‍याकडे ८८ लाख रुपयांची बेहिशेबी मालमत्ता

अधिवक्त्याकडून १ कोटी ७० लाख रुपयांची लाच स्वीकारण्याच्या प्रकरणात बाळासाहेब वानखेडे यांना अटक करण्यात आली होती. त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे उत्पन्नापेक्षा ८८ लाख ८५ सहस्र रुपयांची मालमत्ता अधिक असल्याचे आढळून आले.

राज्यात लाचलुचपत विभागाच्या कारवाईत वर्षभरात ३७६ आरोपींना अटक

गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आकडेवारी ३३ टक्क्यांनी वाढलेली आहे. लाचखोरांच्या कारवाईत नेहमीच आघाडीवर असलेला पुणे विभाग यंदा तिसर्‍या स्थानावर आला आहे. त्यामुळे पुणे विभागात लाचखोरीच्या तक्रारी अल्प आल्या कि कारवाई करण्यात विभाग अल्प पडत आहे, असा प्रश्‍न निर्माण होत आहे.

महंत यती नरसिंहानंद सरस्वती यांच्या हत्येचा कट रचणार्‍या काश्मिरी धर्मांधाला अटक

जहांगिर काश्मीरचा रहाणारा असून त्याने जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेकडून यती नरसिंहानंद सरस्वती यांना ठार मारण्याची सुपारी घेतली होती.

अश्‍लिल व्हिडिओ सिद्ध करून १ कोटीची खंडणी मागणार्‍या नगर येथील महिलेस साथीदारास अटक !

श्रीमंत व्यावसायिकास जाळ्यात ओढून शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडून अश्‍लिल व्हिडिओ बनवत १ कोटी रुपयांची खंडणी मागणार्‍या महिलेसह साथीदारास नगर तालुका पोलिसांनी अटक केली आहे.

पत्रकारांच्या नावाने खंडणी वसूल करणार्‍या तोतया पत्रकाराला अटक !

हा तोतया पत्रकार नवी मुंबई काँग्रेस पदाधिकारी असून नवी मुंबई महापालिकेचा कंत्राटी स्वच्छता कामगार आहे.