नागपूर गुन्हे शाखा पोलिसांकडून एकाच वेळी शहरातील ८६ ठिकाणी धाडी !

२२ जणांना अटक

नागपूर – शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ७ घंट्यांत शहरातील ८६ ठिकाणी धाडी टाकल्या. या कारवाईत १३ लाख रुपयांची ‘एम्.डी. ड्रग्स’, ७.८ लाख रुपयांचा चरस आणि अडीच किलो गांजा जप्त करण्यात आला आहे, तसेच या कारवाईत २२ जणांना अटक करण्यात आली आहे.