बेंगळुरूमध्ये रेमडेसिविरच्या रिकाम्या कुपीमध्ये ग्लुकोज भरून विक्री करणार्‍या एका डॉक्टरसह वॉर्डबॉयला अटक

अशा डॉक्टरांची वैद्यकीय पदवी काढून घेऊन त्यांना कठोर शिक्षा केली पाहिजे !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

बेंगळुरू (कर्नाटक) – शहरात नकली रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री करणारे खासगी रुग्णालयाचे डॉ. सागर आणि वॉर्डबॉय कृष्णा यांना पोलिसांनी अटक केली आहे. शासनाकडून ‘रोहीत’ या नावाने हे दोघे रेमडेसिविर इंजेक्शन मागवत आणि त्यातील अर्धेच इंजेक्शन रुग्णांसाठी वापरून उरलेले काळ्या बाजारात विकत होते. एवढेच नव्हे, तर रिकाम्या रेमडेसिविरच्या कुप्यांमध्ये ग्लुकोज घालून २० सहस्रांपेक्षा अधिक रुपयांनी त्याची विक्री करत होते. या आधी नियमबाह्यरित्या रेमडेसिविरची विक्री करण्याच्या आरोपाखाली अटक झालेल्या मुनिराज याला कह्यात घेतल्यावर त्याची चौकशी केली असता त्याने वॉर्डबॉय कृष्णाचे नाव घेतल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर कृष्णा याची चौकशी केली असता यातील प्रमुख डॉ. सागर यांचे नाव उघडकीस आले.