
नवी मुंबई – पनवेल आणि नवी मुंबईतील काही पत्रकारांच्या नावाची सूची बनवून त्याद्वारे व्यावसायिकांकडून खंडणी वसूल करणार्या नेरूळ येथील तोतया पत्रकार वीरेंद्र म्हात्रे याला खारघर पोलिसांनी अटक केली आहे. हा तोतया पत्रकार नवी मुंबई काँग्रेस पदाधिकारी असून नवी मुंबई महापालिकेचा कंत्राटी स्वच्छता कामगार आहे.
राजे प्रतिष्ठान कामगार संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बशीर कुरेशी यांनी काही पत्रकारांच्या विनंतीवरून त्यांना जीवनावश्यक वस्तू दिल्या होत्या. यातील मसाल्याची पाकिटे खराब असल्याने पत्रकार संतप्त झाले. याविषयी बातमी देऊ नये; म्हणून १२ पत्रकारांचे प्रत्येकी ५ सहस्र रुपये अशा स्वरूपात म्हात्रे याने बशीर यांच्याकडे खंडणी मागितली. या प्रकरणी बशीर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर पोलिसांनी खारघर येथे खंडणीची रक्कम स्वीकारतांना वीरेंद्र म्हात्रे याला अटक केली.
खंडणीच्या प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा सब्यसाची दत्ता यास अटक
Priyank Kharge : (म्हणे) ‘रा.स्व.संघाने नोंदणीची कागदपत्रे सिद्ध ठेवावीत !’
Gokarna Temple : गोकर्ण येथील जगप्रसिद्ध महाबळेश्वराचे ‘आत्मलिंग’ सांडपाण्यात बुडाले !
लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडे सापडले घबाड !
पुणे येथे पोलिसांचा गणवेश घालणार्या बनावट मुसलमान महिलेला अटक !
‘NEET’ Re-Examination : ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सिद्ध करणारे तज्ञ २१ जूनपूर्यंत रहाणार अज्ञातवासात !