नीमच (मध्यप्रदेश) येथे सनातन संस्थेच्या वतीने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सैनिकांसाठी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर मार्गदर्शन

या प्रवचनाचा समारोप करतांना कमांडंट श्री. सूरजपाल वर्मा यांनी संस्थेने केलेल्या मार्गदर्शनानुसार कृती करण्याविषयी उपस्थितांना सांगितले.

पाकिस्तानकडून होणारी सायबर आक्रमणे आणि भारताची सुरक्षा !

भारताने ‘सायबर डोमेन’मध्येही एक ‘स्ट्राईक’ करणे आवश्यक झाले आहे. या माध्यमातून पाकिस्तानला दाखवून द्यायला पाहिजे की, तुम्ही आमच्या ‘क्रिटीकल इन्फॉर्मेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर’ला धोका देऊ शकता, तर आम्ही त्याहून मोठा धोका तुमच्या ‘क्रिटीकल इन्फॉर्मेशन सिस्टीम’ला देऊ शकतो.

विसापूर (जिल्हा सातारा) येथील सुभेदार विजय शिंदे यांना वीरगती

लडाख येथे सैनिकांना घेऊन जाणारी बस नदीमध्ये कोसळून मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये खटाव तालुक्यातील विसापूर येथील सुभेदार विजय सर्जेराव शिंदे यांना वीरमरण प्राप्त झाले.

बारामुल्ला येथे ३ पाकिस्तानी आतंकवादी ठार

बारामुला येथे सुरक्षादलांनी जैश-ए-महंमदच्या ३ पाकिस्तानी आतंकवाद्यांना ठार केले. त्यांच्या जवळ शस्त्रसाठा मिळाला. यावर्षी आतापर्यंत २२ पाकिस्तानी आतंकवाद्यांना ठार करण्यात आले आहे.

युक्रेनकडून पहिल्या युद्धगुन्हेगार रशियन सैनिकास जन्मठेप !

२१ वर्षीय वादिम शिशिमरिन् असे या रशियन सैनिकाचे नाव असून तो रणगाडा कमांडर आहे. त्याला ६२ वर्षीय ओलेक्सांद्र शेलिपोव्ह यांच्या मृत्यूप्रकरणी दोषी ठरवण्यात आले.

चीनच्या सीमेवर भारताचे ५० सहस्र सैनिक तैनात !

पाकपुरस्कृत आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकलाच नष्ट केले पाहिजे, हे भारतीय शासनकर्त्यांनी ओळखून तशी व्यूहरचना करायला हवी !

परिणाम भोगायला सिद्ध राहा !

फिनलँड देशाने ‘नाटो’ देशांमध्ये सहभागी होण्याची घोषणा केल्यानंतर रशियाने संताप व्यक्त करत ‘परिणाम भोगायला सिद्ध रहा’ अशी धमकी दिली आहे. फिनलँडची रशियाला लागून जवळपास १ सहस्र ३०० किलोमीटरची सीमारेषा आहे.

‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्राच्या सुधारित आवृत्तीची यशस्वी चाचणी

‘ब्राह्मोस’च्या साहाय्याने शत्रूंची महत्त्वाची ठिकाणे, अण्वस्त्र ठेवण्यात आलेले बंकर, आदेश आणि नियंत्रण केंद्र, समुद्रातील विमानवाहू नौका यांवर आणि युद्धजन्य परिस्थितीत अचूक नेम साधण्यास साहाय्य होणार आहे. यानंतर ‘ब्रह्मोस क्षेपणास्त्राची मारक क्षमता ८०० कि.मी.पर्यंत वाढवण्यात येणार आहे.

पाक पाकव्याप्त काश्मीरमधील ‘हुंजा खोरे’ चीनला कर्जाच्या मोबदल्यात देणार !

जोपर्यंत भारत पाकव्याप्त काश्मीरवर सैनिकी कारवाई करून त्यास कायमस्वरूपी स्वत:च्या नियंत्रणात घेत नाही, तोवर पाक अशाच प्रकारे पाकव्याप्त काश्मीरमधील भूभाग चीनच्या घशात घालत रहाणार !

हेरगिरीच्या प्रकरणी भारतीय वायूदलाच्या सैनिकाला अटक

अशा सैनिकांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे अन्य कुणाचे अशी चूक करण्याचे धाडस होणार नाही !