‘सैनिक सुरक्षा’ कायदा करा ! – निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत

निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत

सातारा, ४ जानेवारी (वार्ता.) – माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या पोलीस ठाण्यात एका माजी सैनिकाची नियुक्ती करण्याचे आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिले आहे, अशी माहिती निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत म्हणाले की, ‘सैनिक सुरक्षा’ कायदा करण्यात यावा, अशी मागणी आम्ही सरकारकडे करणार आहोत. महाराष्ट्रात गावगुंडांकडून सैनिकांच्या भूमी बळकावण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत, तसेच माजी सैनिकांना मारहाण झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय यांना संरक्षण मिळणे आवश्यक आहे. (माजी सैनिकांना संरक्षण मिळण्यासाठी कायदा करण्याची मागणी करावी लागणे, हे दुर्दैवी आहे. समाजाची सात्त्विकता वाढल्यासच गुंडप्रवृत्ती अल्प होणार आहे. त्यासाठी धर्मशिक्षणाला पर्याय नाही ! – संपादक)