जम्मू-काश्मीरमध्ये सैन्याचे वाहन दरीत कोसळून ३ सैनिकांचा मृत्यू

कुपवाडा (जम्मू-काश्मीर) – येथे एका अपघातात ३ सैनिकांचा मृत्यू झाला. येथील माछिल परिसरात गस्तीवर असणार्‍या सैन्याचे वाहन दरीत कोसळल्याने ही दुर्घटना घडली.

या परिसरात हिमवर्षाव होत असून त्यामुळे रस्त्यावर बर्फ जमा होत आहे. या बर्फावरून जात असतांना गाडीचे चाक घसरल्याने गाडी अनियंत्रित होऊन दरीत कोसळली.