आम्हाला भारतात समाविष्ट करा !

गिलगिट-बाल्टिस्तान येथील नागरिकांची जोरदार मागणी

गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये पाकचे सरकार आणि सैन्य यांच्या विरोधात निदर्शने

नवी देहली – पाकिस्तानमधील आर्थिक संकटाच्या पार्श्‍वभूमीवर पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तानमधील लोक गेल्या १२ दिवसांपासून पाकचे सरकार आणि सैन्य यांच्या विरोधात निदर्शने करत आहेत. ‘भारतातील लडाखमधील कारगिल जिल्ह्यात गिलगिट बाल्टिस्तानचा समावेश करावा’, अशी मागणी त्यांनी केली. ‘पाकिस्तानचे सरकार आमच्याशी भेदभाव करत आहे; पण आता आम्ही गिलगिट-बाल्टिस्तानचा निर्णय स्वत घेऊ’, असेही त्यांचे म्हणणे आहे.

१. आंदोलन करणार्‍या लोकांचे व्हिडिओही समोर येत आहेत. ज्यामध्ये आंदोलक ‘आर-पार जोड दो, काश्मीर का द्वार खोल दो’ (काश्मीरचे दरवाजे उघडून अलीकडचा आणि पलीकडचा परिसर जोडा) अशा घोषणा दिल्या. ‘पाक सरकार आमचे निर्णय घेणार नाही आणि आम्ही त्यांना तसे करू देणार नाही’, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.

२. स्थानिक लोकांचा आरोप आहे की, पंजाब आणि खैबर पख्तूनख्वा येथील लोक त्यांच्या भूमीवर अतिक्रमण करत आहेत. या लोकांना पाकच्या सैनिकांचा पाठिंबा आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी सैनिक तैनात करण्यात येत आहेत. पाकचे सैन्य अवैधरित्या पैसे कमवण्यासाठी लोकांच्या भूमी बळकावत आहे.’ या सूत्रावर भारताच्या हस्तक्षेपाचीही मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे.

३. पाक सैन्याला विरोध करणार्‍या मिनावर गावातील लोकांना आजूबाजूच्या भागातील लोकांचाही पाठिंबा मिळत आहे. अनेक आंदोलकांचे म्हणणे आहे की, सैन्याने त्यांना गोळ्या घातल्या, तरी ते त्यांना भूमीवर नियंत्रण मिळवू देणार नाहीत. पाकिस्तानी सैन्य येते आणि आम्हाला मारहाण करते. आमची शेकडो एकर भूमी सैन्याने कोणताही मोबदला न देता बळकावली आहे. आता आम्ही त्यांना एक इंचही भूमी देणार नाही. सैन्य आमची घरे आणि शेत बळकावत आहे. काही अनुचित घटना घडल्यास त्याला सैन्य उत्तरदायी असेल.

संपादकीय भूमिका

  • पाकिस्तानी सैन्य भूमी बळकावत करत असल्याचा आरोप !
  • भारताने आता अधिक वाट न पहाता सैन्यकारवाई करून पाकव्याप्त काश्मीर  पुन्हा भारताला जोडले पाहिजे. भारताने ही संधी गमावू नये, असेच जनतेला वाटते !