श्री महालक्ष्मीदेवी मंदिरातील मनकर्णिका कुंड आणि अन्य कामे यांसाठी २१ कोटी ६८ लाख रुपये व्ययासाठी राज्यशासनाची मान्यता !

यात मनकर्णिका कुंड कामासाठी ५ कोटी ४० लाख ९९ सहस्र ९३४ रुपये, गरुड मंडप दुरुस्तीसाठी १२ कोटी ८५ लाख ९२ सहस्र ८७ रुपये, तर नगारखाना इमारत दुरुस्तीसाठी ३ कोटी ४१ लाख ३४ सहस्र ७७३ रुपये व्यय केले जाणार आहेत.

पुरातत्व खात्याचे निवृत्त अधिकारी विलास मांगीराज आणि त्र्यंबके यांच्याकडून श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीची पहाणी

श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीच्या संदर्भात पहाणी करून अहवाल सादर करण्याच्या संदर्भात श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी दिवाणी न्यायालयात दावा प्रविष्ट केला असून त्यावर सुनावणी चालू आहे.

ज्ञानवापीनंतर आता धारच्या भोजशाळेचे होणार सर्वेक्षण ! – उच्च न्यायालय, मध्यप्रदेश

मध्यप्रदेशातील धारची भोजशाळासुद्धा हिंदूंची आहे, हे या सर्वेक्षणातून वैज्ञानिक दृष्टीने सिद्ध होणार आहे. अशाच प्रकारे आता देशातील ज्या मंदिरांना पाडून त्यांच्या मशिदी बनवण्यात आल्या, तेथेही असे होणे आवश्यक आहे.

घारापुरी गुहेतील शिवपिंडीचे सहस्रावधी भाविकांनी घेतले दर्शन !

पुरातत्व विभागाने केंद्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यापूर्वी, तसेच युनेस्कोने ‘जागतिक वारसा’ म्हणून घोषित करण्याच्या आधीपासून हिंदूंचे प्राचीन धार्मिक स्थान असलेल्या घारापुरी गुहेतील शिवपिंडीचे महाशिवरात्रीच्या दिवशी सहस्रावधी भाविकांनी दर्शन घेतले.

Adina Mosque Adinath Temple : मालदा (बंगाल) येथील अदीना मशीद हिंदूंचे मंदिर तोडून बांधण्यात आल्याने हिंदूंना तेथे पूजा करण्याची अनुमती द्या !

मुळात आता अशी मागणी करू लागू नये. देशात ज्या ठिकाणी मंदिरे पाडून मशिदी बांधण्यात आल्याचा इतिहास आणि पुरावे आहेत, ते पुरातत्व विभागाने सरकारला सादर करावेत आणि सरकारने अशी सर्व ठिकाणी हिंदूंच्या कह्यात द्यावी !

मुंबईजवळील घारापुरी गुहा भगवान शिवाचे प्राचीन स्थान; महाशिवरात्रीला पूजेची अनुमती मिळावी !

महाराष्ट्र मंदिर महासंघाची केंद्रीय पुरातत्व विभागाकडे मागणी !

वन विभागाच्या भूमीत मुसलमानांकडून बेकायदेशीररित्या धार्मिक विधी !

दुर्गप्रेमींनी पुरातत्व विभाग आणि वन विभाग यांच्याकडे याविषयी तक्रार करूनही त्यांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही ! ‘पुरातत्व विभाग आणि वन विभाग यांची मुसलमानांना फूस असेल’, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?

पुरातत्व विभागाच्या अखत्यारीतील शेकडो प्राचीन धार्मिक स्थळी पूजेचा अधिकार मिळण्यासाठी मुंबईत आंदोलन !

‘घारापुरी लेणी’ (एलेफंटा केव्हज्) येथील शिवमंदिरात हिंदूंना महाशिवरात्री पासून नियमित पूजा करण्याचा अधिकार मिळावा तसेच पुरातत्व विभागाच्या अखत्यारीतील सर्व हिंदू मंदिरांमध्ये हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार मिळावा, यासाठी मुंबईत आंदोलन !

तेलंगाणामध्ये खोदकामाच्या वेळी सापडली १ सहस्र ३०० वर्षांपूर्वीची २ मंदिरे !

तेलंगाणाच्या कृष्णा नदी किनारी वसलेल्या मुदिमानिक्यम गावात पुरातत्व विभागाचे शास्त्रज्ञ भूमीचे खोदकाम करत असतांना त्यांना दगड तुटण्याचा आवाज आला. जेव्हा त्यांनी माती बाजूला करून पाहिले, तेव्हा तिथे दुर्मिळ शिलालेखासह बादामी चालुक्य काळातील २ मंदिरे सापडली.

Ajmer Dargah ASI Survey : अजमेरचा दर्गा पूर्वीचे हिंदूंचे मंदिर असल्याने तेथे पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण करा !

ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिश्ती यांचा दर्गा पूर्वी शिवमंदिर होते. हे मंदिर मुसलमान आक्रमकांनी उद्ध्वस्त केले आणि तेथे दर्गा बांधला. दर्ग्याच्या दरवाज्यांवर आजही स्वस्तिक चिन्हे दिसतात. स्वस्तिक चिन्ह ही जागा हिंदूंची असण्याचे प्रतीक आहे.