Vitthal Mandir Water Leakage : पहिल्याच पावसाळ्यात पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात गळती !

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात गळती

पंढरपूर – येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात ७२ कोटी रुपये व्यय करून मंदिराच्या जतन-संवर्धनाचे काम चालू आहे. १५ मार्चपासून हे काम चालू असून २ जूनपासून भाविकांसाठी पदस्पर्श दर्शन चालू करण्यात आले. दुसरीकडे काल रात्रभर पडलेल्या पावसामुळे मंदिरात अनेक ठिकाणी गळती चालू झाली. दर्शनसाठी आलेल्या भाविकांना मंदिरात मुख्य सभामंडप, सोळखांबी, बाजीराव पडसाळी अशा अनेक ठिकाणी छताच्या वर, भींतींवर आणि खांबालगत पाणी आल्याचे दिसून आले. यामुळे ‘पुरातत्व विभाग, तसेच मंदिर प्रशासन याांच्या वतीने चालू असलेले काम योग्य झाले नाही का ? गळती प्रतिबंधक कोट योग्य प्रकारे देण्यात आला नाही का ?’, असे प्रश्‍न भाविकांकडून उपस्थित केले जात आहेत.

संपादकीय भूमिका

यावरून मंदिराचे जे संवर्धनाचे काम झाले, ते निकृष्ट होते, असाच विचार भाविकांच्या मनात येत आहे. यास उत्तरदायी असलेला पुरातत्व विभाग आणि प्रशासन यांच्यातील संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक !