मानेसर (हरियाणा) येथे ४०० वर्षे जुन्या भगवान श्री विष्णु आणि श्री लक्ष्मीदेवी यांच्या मूर्ती सापडल्या !

मानेसर (हरियाणा) – येथील बागनकी गावात एका भूखंडावर बांधकामासाठी चालू असलेल्या खोदकामाच्या वेळी ३ प्राचीन मूर्ती सापडल्या. यातील भगवान श्रीविष्णूची दीड फूट उंचीची, श्री लक्ष्मीदेवीची एक फूट उंचीची, तर तिसरी मूर्ती शेषशायी भगवान श्री विष्णु आणि श्री लक्ष्मीदेवी यांची आहे.

या सर्व मूर्ती अनुमाने ४०० वर्षे जुन्या असल्याचे सांगितले जाते. या मूर्ती पुरातत्व विभागाकडे सुपुर्द करण्यात आल्या आहेत.

सौजन्य Gurugram News

‘या मूर्ती गावाचा वारसा असल्याने त्या आमच्या कह्यात द्याव्यात. आम्ही येथे मंदिर बांधू’, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच जेथे मूर्ती सापडल्या तेथे आणखी खोदकाम करण्याचीही मागणी केली.