ट्विटरशी स्पर्धा करण्यासाठी फेसबुकचे ‘थ्रेड’ हे नवे सामाजिक माध्यम !

‘थ्रेड’ हे सामाजिक माध्यम ट्विटरशी स्पर्धा करण्यासाठी बनवण्यात आल्याचे तज्ञांचे म्हणणे असून यामध्ये ट्विटरपेक्षा अधिक सुविधा देण्यात आल्या आहेत.

अमेरिका करते जगभरातील एकूण उत्सर्जनापैकी एक चतुर्थांश हानीकारक ‘कार्बन डायऑक्साईड’चे उत्सर्जन !

अमेरिका कारखान्यांच्या माध्यमातून, तसेच वैज्ञानिक उपकरणांच्या अतीवापरामुळे ‘जागतिक तापमानवाढ’ सारख्या भयावह समस्येला अधिक कारणीभूत आहे. यामुळे सर्व देशांनी याविषयी जाब विचारला पाहिजे !

मानवाधिकाराविषयी भारताला आम्ही सल्ले देऊ शकत नाही ! – अमेरिका

अमेरिकेला उशिरा सुचलेले शहाणपण ! आतापर्यंत भारताविरुद्ध खोटे अहवाल प्रसारित करून भारताची अपकीर्ती करणार्‍या अमेरिकेने क्षमायाचना करावी, अशी  मागणी भारताने केली पाहिजे !

अमेरिकेत ‘व्हाईट हाऊस’मध्ये मिळाला ‘कोकेन’ हा अमली पदार्थ !

अमली पदार्थ व्हाईट हाऊसच्या ‘वेस्ट विंग’मध्ये मिळाले. येथे स्वत: राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असून ओव्हल कार्यालय, कॅबिनेट कक्ष, प्रसारमाध्यमांचा कक्ष, तसेच राष्ट्राध्यक्षांसह काम करणार्‍या कर्मचार्‍यांचे कार्यालय आहे.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यता मिळावी ! – ब्रिटन

ब्रिटनने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या विस्तारामध्ये भारत, जपान, जर्मनी, ब्राझिल आणि आफ्रिका या देशांना स्थायी जागा दिली पाहिजे, अशी मागणी केली. सध्या या परिषदेमध्ये केवळ ५ देश स्थायी सदस्य आहेत.

टेक्सास (अमेरिका) येथे गुरुपौर्णिमेच्या दिवशी १० सहस्र लोकांनी केले श्रीमद्भगवद्गीतेचे सामूहिक पठण !

‘योग संगीता ट्रस्ट, अमेरिका’ आणि ‘एस्.जी.एस्. गीता फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हेरगिरी करणार्‍या फुग्‍याला गोपनीय माहिती मिळालेली नाही !

चीनच्‍या हेरगिरी करणार्‍या फुग्‍याद्वारे अमेरिकेची कुठलीही गोपनीय माहिती मिळवण्‍यात आली नव्‍हती, असा खुलासा अमेरिकेने केला. ४ फेबु्रवारी २०२३ या दिवशी अमेरिकेने अलास्‍का येथे आकाशात हेरगिरी करणारा चीनचा भला मोठा फुगा पाडला होता.

अमेरिकेतील शाळांमध्ये हिंदी भाषा शिकवण्याचा प्रस्ताव !

भारताशी व्यापारवृद्धीसाठी हिंदी भाषा येणे अनिवार्य आहे. त्यामुळे अमेरिकेतील शाळांमध्ये हिंदी भाषा शिकवण्याचा प्रस्ताव अमेरिकेतील ‘इंडियन अमेरिकन इम्पेक्ट’ आणि ‘एशिया सोसायटी’ या संघटनांच्या १०० लोकांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यासमोर ठेवला आहे.

(म्हणे) ‘भारत-अमेरिका शस्त्रास्त्र करार आमच्या सुरक्षेसाठी धोकादायक !’ – पाकिस्तान

चोराच्या उलट्या बोंबा ! आशिया खंडात अस्थिरता भारतामुळे नव्हे, तर पाकमुळे वाढते, हे त्याने लक्षात घ्यावे !

अमेरिकी विश्‍वविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या रंगावर आधारित प्रवेश दिला जाणार नाही !

अमेरिकेत वर्णद्वेषाची अनेक प्रकरणे पुढे येत आहेत. तेथील विश्‍वविद्यालयांमध्येही वर्णद्वेषी प्रकार घडतात. अमेरिकेने भारतासह अन्य देशांच्या अंतर्गत गोष्टींत नाक खुपसण्यापेक्षा तिच्या देशांतील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत ! यातच त्या देशाचे भले होईल !