बहुप्रतीक्षित चिपी विमानतळाचे उद्घाटन जानेवारीच्या तिसर्‍या आठवड्यात होणार

चिपी-परूळे येथे साकारात असलेल्या सिंधुदुर्ग (चिपी) विमानतळाच्या प्रवासी वाहतुकीचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. २० जानेवारीनंतर प्रत्यक्ष प्रवासी आरक्षण चालू होणार आहे.

भारतात आता ३१ जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी  

ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराच्या पार्श्‍वभूमीवर सतर्कतेचा उपाय म्हणून केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमानांवर आता ३१ जानेवारीपर्यंत बंदी घातली आहे. ही बंदी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत होती. त्यानंतर ती ७ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली होती.

चिनी प्रवाशांना भारतात आणू नये ! – भारत सरकारचा विमान आस्थापनांना आदेश

भारताने हे योग्यच केले; मात्र त्यासह चीनने नोव्हेंबर मासात जर असा निर्णय घेतला होता, तर भारताने तात्काळ असा निर्णय घेणे राष्ट्रप्रेमींना अपेक्षित होते ! आता भारतीय प्रवाशांना सुखरूप भारतात परत आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !

कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे एअर इंडियाकडून ओमान आणि सौदी अरेबिया येथील विमानसेवाही स्थगित

कोरोनाच्या नव्या प्रकाराचे भारतात संक्रमण होऊ नये म्हणून एअर इंडियाने ब्रिटनसह ओमान आणि सौदी अरेबिया येथे जाणारी विमानसेवा स्थगित केली आहे.

चिपी विमानतळाच्या नामकरणावरून वाद !

येत्या २६ जानेवारी २०२१ या दिवशी वेंगुर्ले तालुक्यातील चिपी येथे उभारण्यात आलेल्या विमानतळाचे उद्घाटन होणार असल्याचे म्हटले जात आहे. याविषयी केंद्रस्तरावरून, तसेच स्थानिक नेतेही सांगत आहे. या उद्घाटनाच्या पार्श्‍वभूमीवर या विमानतळाच्या नामकरणावरून नवा वाद चालू झाला आहे.

एअर इंडियाच्या विमानांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के दरात तिकीट उपलब्ध होणार !

देशातील कोणत्याही ६० वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकाला आता एअर इंडिया आस्थापनाच्या विमानाचे तिकीट निम्म्या दरात मिळणार आहे. एअर इंडियाच्या संकेतस्थळावर याची माहिती देण्यात आलेली आहे; मात्र यासाठी काही अटी असणार आहेत.

युरोपियन युनियनकडून पाकच्या विमानांच्या उड्डाणांवरील बंदी कायम

मे २०२० पासून ही बंदी घालण्यात आली आहे. पाकमधील शेकडो वैमानिकांकडे विमान चालवण्याचा परवाना नसल्याने ही बंदी घालण्यात आली आहे. इस्लामी देशांनीही पाकच्या विमानांवर बंदी घातली आहे.

नौदलाच्या ‘मिग २९ के’ या प्रशिक्षण देणार्‍या विमानाला अरबी समुद्रात अपघात : एक वैमानिक बेपत्ता

भारतीय नौदलाच्या ‘मिग २९ के’ या प्रशिक्षण देणार्‍या विमानाला अरबी समुद्रात अपघात झाला. ही घटना २६ नोव्हेंबरला सायंकाळी घडली. विमानातील एका वैमानिकाला वाचवण्यात आले आहे, तर दुसर्‍याचा शोध घेतला जात आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा ३१ डिसेंबरपर्यंत बंद !

कोरोनाचा प्रभाव कायम असल्याने केंद्र सरकारने ३१ डिसेंबर २०२० पर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ही सेवा ३० नोव्हेंबरपर्यंत बंद असल्याचे घोषित करण्यात आले होते

अयोध्येतील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम’ असे नाव !

अयोध्येत सिद्ध करण्यात येणार्‍या आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम विमानतळ, अयोध्या’ असे नाव देण्यात येणार आहे.