वाराणसी विमानतळावर ‘संस्कृत’मध्येही होते उद्घोषणा !

‘आमच्या आदरणीय प्रवाशांना विमानतळात येताच वाटेल की, ते संस्कृत भाषेचे पीठ असलेल्या शहरात पोचले आहेत.’ हिंदी-इंग्रजीसोबत संस्कृतमध्येही उद्घोेषणा दिला जाणारा वाराणसी विमानतळ हा कदाचित् देशातील पहिला विमानतळ बनला आहे !

कोरोना काळानंतर मनुष्यबळ अभावी ब्रिटनमध्ये विमानांची ९० उड्डाणे रहित !

कोरोना काळानंतर हवाई वाहतूक पूर्ववत् झाली असली, तरी मनुष्यबळाचे संकट युरोपपासून ते अमेरिकेपर्यंतच्या प्रवाशांना अडचणींचा सामना करण्यास भाग पाडत आहे.

‘स्पाईसजेट’चे ‘इमरजंन्सी लँडिंग’ !

‘स्पाईसजेट’च्या विमानाने उड्डाण केल्यावर इंजिनमध्ये आग लागल्याचे लक्षात येताच वैमानिकाने विमान तातडीने खाली उतरवले.

नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव द्या ! – काँग्रेस

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (निर्माणाधीन) प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. या संदर्भातील एक ठराव काँग्रेसच्या ‘ओबीसी मंथन शिबिरा’त संमत करण्यात आला आहे.

गोवा : मोपा विमानतळावर १ सप्टेंबरपासून विमाने उतरणार

गोवा राज्य सरकार आणि ‘जीएम्आर् गोवा’ विमानतळ प्रकल्पासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी कटीबद्ध आहे. राज्यातील युवकांनी खासगी क्षेत्रांतील नोकरीच्या संधीचा लाभ करून घ्यावा, अन्यथा परराज्यांतून येणारे या संधीचा लाभ उठवतील.

नेपाळमधील अपघातग्रस्त विमानाचे अवशेष सापडले

नेपाळच्या तारा एअरलाइनच्या बेपत्ता झालेले विमान अपघातग्रस्त होऊन त्यातील सर्व २२ प्रवासी आणि कर्मचारी यांचा मृत्यू झाला. या विमानाचे अवशेष नेपाळमधीलच हिमालय पर्वतांमध्ये सापडले आहेत.

तालिबानकडून महिलांनी एकट्याने विमान प्रवास करण्यावर प्रतिबंध !

भारतात शाळांमध्ये हिजाबवर बंदी घातल्यावर ‘मुसलमान स्त्रियांच्या हक्कांवर घाला घातला’, अशी बिनबुडाची टीका करणारे भारतातील पुरो(अधो)गामी यांना ‘महिलांच्या हक्कांवर गदा आणणे; म्हणजे नक्की काय असते ?’, हे समजून घेण्यासाठी अफगाणिस्तानला पाठवा !

रशियाच्या धमकीमुळे पोलंडचा युक्रेनला लढाऊ विमाने देण्यास नकार

‘जो देश या युद्धात युक्रेनला लढाऊ विमाने देईल त्यांनाही युद्धात सहभागी करून घेतले जाईल’, अशी धमकी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दिल्यानंतर पोलंडने त्याची घोषणा मागे घेतली आहे.