चिपी येथील विमानतळाचे श्रेय घेणार्‍यांनी जिल्ह्यातील दुर्दशा झालेल्या रस्त्यांचेही श्रेय घ्यावे ! – परशुराम उपरकर, राज्य सरचिटणीस, मनसे

वेंगुर्ले तालुक्यातील चिपी येथील विमानतळाचे श्रेय घेण्यात शिवसेना आणि भाजप यांच्यात चढाओढ लागली आहे; मात्र सत्ताधार्‍यांकडे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी निधी नाही. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गासह ग्रामीण भागातील रस्ते खड्डेमय झाले आहेत.

पंजशीरमधील तालिबान्यांच्या ठिकाणांवर अज्ञात लढाऊ विमानांद्वारे आक्रमण

तालिबानने अफगाणिस्तानमधील पंजशीर प्रांत जिंकल्याचा दावा केला असला, तरी अद्याप तेथे युद्ध चालू असल्याचे वृत्त आहे. काही लढाऊ विमानांनी पंजशीरमध्ये तालिबानच्या स्थानांवर आक्रमण केले आहे.

बाडमेर (राजस्थान) येथे ‘मिग-२१’ लढाऊ विमान कोसळले

उडत्या शवपेट्या झालेली भारतीय वायदूलाची विमाने ! गेली अनेक दशके हीच स्थिती असतांना त्यात कोणताही सत्ताधारी राजकीय पक्ष पालट करत नाही, हे लज्जास्पद !

चीनने पाकला सदोष ‘जेएफ्-१७’ लढाऊ विमाने देऊन फसवले !

पाकला चीनखेरीज दुसरा पर्यायही नसल्याने त्याचा पुरेपूर लाभ चीन उठवून पाकला फसवत आहे, हे पाकच्या नागरिकांना लक्षात येईल तो सुदिन !

संपूर्ण भारतीय बनावटीच्या ‘आय.एन्.एस्. विक्रांत’ची चाचणी यशस्वी

संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका ‘आय.एन्.एस्. विक्रांत’ पुढील वर्षी भारतीय नौदलाच्या सेवेत समाविष्ट केली जाणार आहे.

अफगाणिस्तानच्या कंदहार आंतरराष्ट्रीय विमानतळावर तालिबानकडून रॉकेटद्वारे आक्रमण

तालिबानकडून कंदहार आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेटद्वारे आक्रमण करण्यात आले. एकूण ३ रॉकेट डागण्यात आली. त्यांपैकी १ विमानतळावर, तर २ धावपट्टीवर पडली.

फिलिपीन्सचे सैनिकी विमान कोसळून १७ जणांचा मृत्यू

फिलिपीन्समध्ये ८५ लोकांना घेऊन जाणारे सैनिकी विमान धावपट्टीवर उतरतांना झालेल्या अपघातामध्ये १७ जणांचा मृत्यू झाला, तर ४० जण घायाळ झाले.

गलवान खोर्‍यातील संघर्षानंतर भारताकडून सीमेवर ५० सहस्र सैनिक तैनात ! – ‘ब्लूमबर्ग’ वृत्तसंस्थेचा दावा

लडाखमधील गलवान खोर्‍यामध्ये वर्षभरापूर्वी झालेल्या भारत आणि चीन संघर्षानंतर भारताने नवी व्यूहरचना आखत येथे ५० सहस्र सैनिक तैनात केले आहेत. भारताने उचललेले हे पाऊल ऐतिहासिक आहे, असे वृत्त ‘ब्लूमबर्ग’ वृत्तसंस्थेने दिले आहे.

लडाख सीमेजवळ चीनच्या लढाऊ विमानांचा सराव !

चीनच्या वायूदलाकडून लडाख सीमेजवळील त्याच्या तळावर सराव करण्यात येत आहे. २० ते २२ लढाऊ विमाने या सरावात सहभागी झाल्याचे दिसून आली. यात जे-११ आणि जे-१६ या विमानांचा समावेश आहे.

वायूदलाचे मिग २१ लढाऊ विमान कोसळून वैमानिकाचा मृत्यू

आजपर्यंत शेकडो मिग विमाने कोसळून अनेक सैनिकांच्या झालेल्या मृत्यूला आजपर्यंतचे शासनकर्ते उत्तरदायी आहेत ! शांतताकाळात सैन्यदलाची अशी अपरिमित हानी होणे लज्जास्पद !