रशियाच्या धमकीमुळे पोलंडचा युक्रेनला लढाऊ विमाने देण्यास नकार

लढाऊ विमान

वॉर्सा (पोलंड) – पोलंडने युक्रेनला रशियाच्या विरोधात लढण्यासाठी लढाऊ विमाने देण्याचे घोषित केले होते; मात्र ‘जो देश या युद्धात युक्रेनला लढाऊ विमाने देईल त्यांनाही युद्धात सहभागी करून घेतले जाईल’, अशी धमकी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दिल्यानंतर पोलंडने त्याची घोषणा मागे घेतली आहे. ‘आम्ही युक्रेनला आमच्याकडील ‘मिग २९’ आणि ‘सुखोई २५’ ही लढाऊ विमाने देण्यास सिद्ध आहोत; परंतु याची भरपाई म्हणून अमेरिकेने आम्हाला ‘एफ् १६’ विमाने द्यावीत’, असे पोलंडने म्हटले होते. त्याला अमेरिकेने मान्यताही दिली होती. ‘जर ‘नाटो’ (नॉर्थ अ‍ॅटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन) या संस्थेशी निगडीत देशांनी युक्रेनला सैन्य साहाय्य केले, तर त्यांच्यावरहीकारवाई केली जाईल’, अशी चेतावणी रशियाने यापूर्वीच दिली होती.