वाराणसी विमानतळावर ‘संस्कृत’मध्येही होते उद्घोषणा !

वाराणसी विमानतळ व्यवस्थापनाचा स्तुत्य निर्णय

वाराणसी विमानतळ

वाराणसी (उत्तरप्रदेश) – वाराणसी विमानतळावर हिंदी-इंग्रजीसोबत ‘संस्कृत’ मध्येही उद्घोषणा ऐकायला मिळते. येथे कोविडशी संबंधित खबरदारी आणि मार्गदर्शक सूत्रे हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त संस्कृतमध्येही उद्घोेषणा करून सांगितली जात आहेत.

याविषयी माहिती देतांना वाराणसी विमानतळ व्यवस्थापनाने लिहिले आहे, ‘आमच्या आदरणीय प्रवाशांना विमानतळात येताच वाटेल की, ते संस्कृत भाषेचे पीठ असलेल्या शहरात पोचले आहेत.’ हिंदी-इंग्रजीसोबत संस्कृतमध्येही उद्घोेषणा दिला जाणारा वाराणसी विमानतळ हा कदाचित् देशातील पहिला विमानतळ बनला आहे.