लंडन/न्यूयॉर्क – कोरोना काळानंतर हवाई वाहतूक पूर्ववत् झाली असली, तरी मनुष्यबळाचे संकट युरोपपासून ते अमेरिकेपर्यंतच्या प्रवाशांना अडचणींचा सामना करण्यास भाग पाडत आहे. २० जूनला लंडनच्या हिथ्रो विमानतळावर १० टक्के उड्डाणे रहित करावीत, असा आदेश प्रवाशांचे व्यवस्थापन करण्यास अपयशी ठरलेल्या विमानतळ अधिकार्यांकडून विमान आस्थापनांना अचानक देण्यात आला. याचा ९० उड्डाणांवर आणि १५ सहस्र प्रवाशांवर थेट परिणाम झाला. ब्रिटनच्या रेल्वे प्रवाशांनाही संकटाचा सामना करावा लागत आहे. देशात ४० सहस्र रेल्वे कर्मचारी संपावर गेले आहेत. संपामुळे देशभरात २० टक्के रेल्वेगाड्या धावणार नाहीत. याचा परिणाम ५ लाख लोकांवर होईल.
उड्डाणे रहित होण्याचे सर्वांत मोठे कारण मनुष्यबळाची टंचाई आहे. कोरोनापूर्वी ब्रिटनमध्ये ७४ सहस्र लोक विमान आस्थापनांत काम करत होते. कोरोनामुळे ३० सहस्र कर्मचार्यांची कपात करण्यात आली. या समवेतच विमानतळ आणि विमान सहकारी म्हणून काम करणार्या ६६ सहस्र लोकांपैकी बहुतांश लोकांना कामावरून कमी केले आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानुसार देशात विविध क्षेत्रात १२ लाख ९५ सहस्र पदे रिक्त आहेत.
UK airport warns COVID-related delays could last months https://t.co/Kt5yy8xFC3
— 7News Boston WHDH (@7News) April 8, 2022
अमेरिकेत आठवड्याभरात १४ सहस्र उड्डाणे रहित !
अमेरिकेत या आठवड्यात १ सहस्र उड्डाणे रहित करण्यात आली. या मासात एकूण १४ सहस्र उड्डाणे रहित झाली आहेत. बेल्जियमचे ब्रुसेल्स विमानतळ बंद करण्यात आले आहे. तेथील सुरक्षा रक्षक संपावर गेले आहेत.