सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

आताचा काळ हा वाईट काळ आहे. ‘आपण आपला नामजप आणि साधना वाढवणे’, हाच यावर एकमेव उपाय आहे.

इतरांचा विचार करणार्‍या आणि सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे सतत स्मरण करणार्‍या सनातनच्या ५८ व्या संत पू. (कै.) श्रीमती विजयालक्ष्मी काळेआजी (वय ८८ वर्षे) !

‘२४.१२.२०२३ या दिवशी पू. (श्रीमती) विजयालक्ष्मी काळेआजी यांनी देहत्याग केला. २१.३.२०२४ या दिवशी त्यांचे त्रैमासिक श्राद्ध आहे. त्या निमित्त त्यांच्या मुलीला त्यांच्या रुग्णाईत स्थितीत जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

शारीरिक त्रासातही तळमळीने सेवा करणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती भाव असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील कु. पूनम चौधरी (वय ३८ वर्षे) !

फाल्गुन शुक्ल द्वादशी (२१.३.२०२४) या दिवशी कु. पूनम चौधरी यांचा ३८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधकांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील औषध दुकानांवर कारवाया !

औषध दुकानांमध्ये खरेदी-विक्रीचा ताळमेळ नसणे, औषधांची नोंदवही नसणे, फार्मासिस्ट नसणे, मुदतबाह्य, तसेच चिठ्ठीविना औषधांची विक्री करणे, फार्मासिस्टच्या अनुपस्थितीत औषधांची विक्री होणे, अशा कारणांवरून ही कारवाई करण्यात आली आहे.

सांगली येथे इयत्ता १ लीतील मुलीशी गैरवर्तन करणार्‍या शिक्षकाला अटक !

विश्रामबाग येथील ‘महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी’च्या एका खासगी शाळेमध्ये इयत्ता १ लीमध्ये शिक्षण घेणार्‍या एका विद्यार्थिनीशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करणार्‍या शिक्षक संदीप पवार याला पोलिसांनी अटक केली आहे.

सनातन संस्‍थेचे सर्व उपक्रम समाजाचे आध्‍यात्‍मिक कल्‍याण करणारे ! – चेतन राजहंस, राष्‍ट्रीय प्रवक्‍ते, सनातन संस्‍था

सनातन संस्‍था ही आध्‍यात्‍मिक संस्‍था असून तिचे सर्व उपक्रम समाजाचे आध्‍यात्‍मिक कल्‍याण साध्‍य करणारे आहेत. सनातन संस्‍थेची २५ वर्षे, म्‍हणजे समाजाच्‍या आध्‍यात्‍मिक सेवेची २५ वर्षे आहेत.

‘कर्नाटक धार्मिक संस्‍था आणि धर्मादाय इलाखा सुधारणा विधेयक २०२४’ रहित करा !

कर्नाटक सरकारने २० फेब्रुवारी २०२४ या दिवशी ‘कर्नाटक धार्मिक संस्‍था आणि धर्मादाय इलाखा अधिनियम १९९७’ यात आणखी सुधारणा केल्‍या आहेत.

मुंबईत निवडणूक भरारी पथकाला ७२ लाख रुपयांची रक्कम सापडली

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने ७२ लाख ३९ हजार ६७५ रुपये रक्कम घाटकोपर पूर्व परिसरात एका गाडीतून पकडली. ही रक्कम प्राप्तीकर विभागाच्या कह्यात देण्यात आली आहे.

खासदार श्रीकांत शिंदे यांना तिसर्‍यांदा निवडून आणा ! – भाजप

खासदार श्रीकांत शिंदे यांना तिसर्‍यांदा निवडून आणण्यासाठी कल्याण मतदारसंघात सिद्धता करा, असे आवाहन भाजपचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पदाधिकार्‍यांना केले. नुकत्याच येथे झालेल्या मेळाव्यात त्यांनी वरील आवाहन केले.