नाशिक – येथील औषधांच्या १९६ दुकानांचे परवाने अन्न व औषध प्रशासनाने (‘एफ्.डी.ए.’ने) गेल्या ४ वर्षांत रहित केले आहेत. एप्रिल २०२३ ते फेब्रुवारी २०२४ मध्ये १७ दुकानांचे परवाने रहित करण्यात आले आहेत. नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर येथे पडताळणी करून कारवाई केली.
या औषध दुकानांमध्ये खरेदी-विक्रीचा ताळमेळ नसणे, औषधांची नोंदवही नसणे, फार्मासिस्ट नसणे, मुदतबाह्य, तसेच चिठ्ठीविना औषधांची विक्री करणे, फार्मासिस्टच्या अनुपस्थितीत औषधांची विक्री होणे, अशा कारणांवरून ही कारवाई करण्यात आली आहे.
वर्ष २०२१ मध्ये सर्वाधिक १०८ दुकानांवर कारवाई करण्यात आली होती.