सांगली, २० मार्च (वार्ता.) – विश्रामबाग येथील ‘महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी’च्या एका खासगी शाळेमध्ये इयत्ता १ लीमध्ये शिक्षण घेणार्या एका विद्यार्थिनीशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करणार्या शिक्षक संदीप पवार याला पोलिसांनी अटक केली आहे. संस्थेनेही या शिक्षकावर तात्काळ बडतर्फीची कारवाई केली असून ‘अशा समाजविघातक प्रकारांना संस्था कदापि पाठीशी घालणार नाही’, असा निर्वाळा संस्थेच्या वतीने देण्यात आला. (अशा वासनांध शिक्षकांना आजन्म कारावासाची शिक्षा केली पाहिजे. – संपादक)
पीडित विद्यार्थिनीशी शिक्षक संदीप पवार यांनी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पीडितेने पालकांना सांगताच पालकांनी याविषयी संस्थेचे सचिव सुरेंद्र चौगुले यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर संस्थेने त्यांना तात्काळ बडतर्फ केले. पीडितेच्या आईने याविषयी विश्रामबाग पोलीस ठाण्यात रितसर तक्रार प्रविष्ट केली असून पोलिसांनी शिक्षक पवार याला अटक केली आहे. ‘या प्रकरणी प्रविष्ट करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या अन्वेषणात संस्थेने सहकार्य करण्याचे मान्य करत हा प्रकार घडत असतांना झालेले चित्रीकरण अन्वेषणासाठी देण्यात येईल. शिक्षण क्षेत्रात असे प्रकार संस्था कदापि खपवून घेणार नाही’, असे सुरेंद्र चौगुले यांनी सांगितले.
संपादकीय भूमिकाअसे शिक्षक विद्यार्थ्यांना काय घडवणार ? |