श्रवण आणि ऐकणे यांमुळे माणूस विद्वान होतो !
‘श्रवण’ हे विद्वत्ता संपादनाचे साधन आहे. पूर्वीच्या काळी मुद्रणालये नसल्यामुळे पुस्तके-ग्रंथ ही वस्तू फार दुर्मिळ होती. त्यामुळे ‘ज्ञान’ हे ऐकूनच मिळवावे लागत असे. आज मुद्रणाच्या सुलभतेमुळे पुस्तके वाचूनही विद्वत्ता संपादन करणे शक्य आहे.