‘गुरुदेवांनी आमच्यावर केलेल्या कृपावर्षावाविषयीचे लिखाण शब्दांत मांडणे केवळ अशक्य आहे. माझा मुलगा श्री. हिमनीश (वय २१ वर्षे) याला पूर्वी साधनेत विशेष रुची नव्हती; परंतु एकदा त्याला सेवा शिकण्याच्या निमित्ताने २० दिवसांसाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात रहाण्याची संधी मिळाली. तेव्हा त्याच्यात झालेले पालट येथे दिले आहेत.
१. नामजपादी उपायांचे साहाय्य घेतल्यावर पदव्युत्तर प्रवेशपरीक्षेच्या सिद्धतेत येणार्या अडचणी दूर होऊन त्याला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळणे
मी आणि माझी पत्नी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करत असल्याने आम्ही आमचा मुलगा श्री. हिमनीश यालाही साधना करण्याचा आग्रह करायचो. केवळ आमच्या समाधानासाठी तो साधना करायचा; परंतु त्याला त्यात रुची नव्हती. कधी कधी त्याला साधना करायला सांगण्यावरून आमचे मतभेदही व्हायचे. पुढे देवानेच त्याच्या जीवनात साधनेला अनुकूल परिस्थिती निर्माण केली. तो पदव्युत्तर प्रवेशपरीक्षेची सिद्धता करू लागला. तेव्हा त्याला पुष्कळ अडचणींना सामोरे जावे लागले. त्या वेळी त्याने नामजपादी उपायांचे साहाय्य घेतले आणि तो थोडा स्थिरावला. त्या परीक्षेत तो उत्तीर्ण झाला आणि त्याला एका चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला.
२. रामनाथी आश्रमात राहून सेवा शिकण्याचा मनोदय व्यक्त केल्यावर आश्रम व्यवस्थापनाकडून अनुमती मिळणे
महाविद्यालय चालू होण्यापूर्वी रामनाथी आश्रमात जाऊन काही सेवा शिकण्याचा मनोदय त्याने आमच्याकडे व्यक्त केला. आम्ही होकार दिल्यावर त्याने आश्रम व्यवस्थापनाकडे अनुमती मागितली. आश्चर्याची गोष्ट, म्हणजे त्याला २० दिवस आश्रमात रहाण्याची अनुमती मिळाली. त्या काळात त्याने तमिळनाडू येथील प्रसारसेवेला पूरक अशा काही सेवा शिकून घेतल्या.
३. आश्रमातून घरी परतल्यावर हिमनीशच्या वागण्यात, तसेच दृष्टीकोनांत झालेले पालट
१. इतरांचे ऐकणे आणि स्वीकारणे यांत वाढ होणे
२. त्याच्या बोलण्याच्या पद्धतीत सुधारणा होऊन, त्याने सर्वांशी आदराने बोलणे (हा पालट साधकांनाही जाणवला आणि त्यांनी आम्हाला सांगितला.)
३. वेळेचा सदुपयोग करणे
४. अल्प प्रमाणात नियोजन करण्यास आरंभ करणे
५. कोणतीही कृती करण्यापूर्वी परिणामांचा विचार करणे
६. आईशी मनमोकळेपणाने आणि मृदू भाषेत बोलणे
आता आम्हाला त्याच्या एकूण वागण्यातच पालट जाणवत आहेत. यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ती (सौ.) बिंदा निलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ती (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. बालाजी कोल्ला (श्री. हिमनीश याचे वडील), चेन्नई (२९.६.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |