‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे ‘वयाच्या ८० व्या वर्षी भक्तीयोगाची साधना चालू झाली’, हे उद्गार आणि त्याचा पू. संदीप आळशी यांनी सांगितलेला गर्भितार्थ !’, या लेखाच्या संदर्भात मिळालेले सूक्ष्म स्तरीय ज्ञान आणि आलेली अनुभूती

‘३.७.२०२३ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे ‘वयाच्‍या ८० व्‍या वर्षी भक्तीयोगाची साधना चालू झाली’, हे उद्गार आणि त्‍याचा पू. संदीप आळशी यांनी सांगितलेला गर्भितार्थ !’, हा लेख प्रसिद्ध झाला होता. या लेखाच्या संदर्भात मला मिळालेले सूक्ष्म स्तरीय ज्ञान आणि आलेल्या अनुभूती येथे देत आहे.

कर्करोगासारख्या दुर्धर आजाराला स्थिर राहून सामोरे जाणारे देवद, पनवेल येथील कै. प्रभाकर भालचंद्र प्रभुदेसाई !

‘२७.११.२०२३ या दिवशी देवद, पनवेल येथील प्रभाकर भालचंद्र प्रभुदेसाई यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी कर्करोगामुळे निधन झाले. १५.११.२०२४ या दिवशी त्यांचे प्रथम वर्षश्राद्ध आहे. त्यानिमित्ताने . . .

गुरुदेवांची कृपावृष्टी !

‘देव आपल्यासाठी किती करतो !; मात्र मीच किती उणा पडतो’, असे विचार माझ्या मनात घोळत होते. त्या वेळी गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना) आळवतांना जे शब्द स्फुरले, ते गुरुदेवा तुमच्या चरणी अर्पण करतो.

पुणे येथील ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’साठी ध्वनीक्षेपकाची अनुमती

शहरामध्ये १८ ते २२ डिसेंबर २०२४ या कालावधीत ७० वा ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ आयोजित केला आहे. या महोत्सवातील २१ डिसेंबर या दिवशी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक आणि ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करण्यास जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी अनुमती दिली आहे.

मुंबईत पोलीस निरीक्षकावर आक्रमणकर्त्याच्या विरोधात गुन्हा नोंद !

वांद्रे परिसरात गस्त घालणार्‍या ओशिवरा पोलीस ठाण्यातील प्रभारी पोलीस निरीक्षक मनोज गुजर यांच्यावर आक्रमण करणार्‍या ४१ वर्षीय आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पुणे महापालिकेच्या आवारात शिरस्त्राणसक्ती करण्याचा आदेश !

पुणे महापालिका भवनाच्या आवारात, तसेच महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालय, अन्य कार्यालये यांच्या आवारात दुचाकी वापरणारे कर्मचारी आणि अधिकारी यांना शिरस्त्राणसक्ती करण्यात आलेली आहे. शिरस्त्राण नसेल तर आवारात प्रवेश देऊ नये आणि गाडी लावू देऊ नये