सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय करून तीव्र आध्यात्मिक त्रासावर मात करणार्‍या कु. मधुरा चतुर्भुज !

‘वर्ष २०१६ पासून मी आणि माझी आई रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करत आहोत. आरंभी मला वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी ८ ते १० घंटे नामजपादी उपाय करायला सांगितले होते. देवाच्या कृपेने ते माझ्याकडून भावपूर्ण झाले आणि मला विविध अनुभूतीही आल्या. नामजपादी उपाय भावपूर्ण आणि परिणामकारक केल्यावर माझ्यामध्ये झालेले पालट येथे दिले आहेत.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

१. नामजपादी उपाय केल्यानंतर मनाचा संघर्ष उणावणे आणि आश्रमात रहाणे जमू लागणे

आरंभी मी घरून आश्रमात आल्यावर माझ्या मनात घरी जाण्याचे विचार पुष्कळ असायचे. तेव्हा मला आश्रमातील चैतन्य सहन होत नव्हते आणि मला आश्रमात रहाण्यासाठी पुष्कळ संघर्ष करावा लागत होता. नामजपादी उपाय केल्यानंतर मला आश्रमात रहाणे जमू लागले.

२. नामजपादी उपाय नियमित केल्यामुळे आध्यात्मिक त्रासांशी लढता येणे आणि रागावर नियंत्रण ठेवता येणे

कु. मधुरा चतुर्भुज

माझ्या मनात पुष्कळ दिवस नकारात्मक विचार असायचे. माझ्यामध्ये ‘चिडचिड करणे, राग येणे, प्रतिक्रिया येणे’, असे स्वभावदोष होते. त्यामुळे माझे रागावर नियंत्रण रहात नव्हते. मी आईवर चिडचिड करायचे. तिला त्याचा पुष्कळ त्रास व्हायचा. नामजपादी उपाय केल्यामुळे मी स्वावलंबी झाले. आई घरी आल्यावर मी तिच्याशी प्रेमाने बोलायचे. त्यामुळे आम्ही दोघी आनंदात राहू लागलो.

माझी आई अध्यात्मप्रसार करण्यासाठी जायची. तेव्हा मी नामजप करत घरातील कामे करायची. नामजपादी उपाय नियमित केल्यामुळे मी आध्यात्मिक त्रासांशी लढू लागले.

३. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यामुळे आध्यात्मिक त्रास न्यून होणे

सद्गुरु गाडगीळकाका यांनी तीव्र आध्यात्मिक त्रासांसाठी मला नामजपादी उपाय करण्यास सांगितले. ते उपाय देवाने माझ्याकडून करून घेतले. उपाय करण्यासाठी देवानेच मला शक्ती दिली. आता माझा आध्यात्मिक त्रास पुष्कळ न्यून झाला आहे. त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते.’

– कु. मधुरा मोहन चतुर्भुज, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.७.२०२४)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक