सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या सत्संगामध्ये श्रीमती मनीषा केळकर यांना शिकायला मिळालेली सूत्रे

 १. ‘साधकांच्या प्रत्येक क्षणाचा वापर साधनेसाठी व्हायला हवा’, यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा कटाक्ष असणे ‘एके दिवशी रामनाथी आश्रमात आम्हाला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या (गुरुदेवांच्या) भावसत्संगाला उपस्थित रहाण्याची संधी मिळाली. भावसत्संग चालू असतांना गुरुदेवांची औषधे घेण्याची वेळ झाली. त्या वेळी गुरुदेवांनी सौ. स्वाती शिंदे (आध्यात्मिक पातळी टक्के ६६ टक्के, वय ३७ वर्षे), सौ. … Read more

महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत २४ महत्त्वाचे निर्णय !

२३ सप्टेंबर या दिवशी झालेल्या राज्यशासनाच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत २४ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘न भूतो न भविष्यति ।’ अशा झालेल्या ब्रह्मोत्सवाच्या निमित्त सातारा जिल्ह्यातील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

गुरुदेवांच्या ब्रह्मोत्सवाच्या दिवशी सकाळी मी त्यांच्या छायाचित्राला नमस्कार करत असतांना त्यांच्या छायाचित्रामध्ये ‘प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांचे शिष्य परात्पर गुरु डॉ. आठवले झुल्यावर बसले आहेत’, असे मला स्पष्टपणे दिसले. मी ३ मिनिटे भावावस्था अनुभवली.

कौटुंबिक अडचणींना धीराने सामोरे जाऊन गुरुचरणांशी स्थिर रहाणार्‍या खारघर, नवी मुंबई येथील सौ. शकुंतला मोहन बद्दी (वय ६२ वर्षे ) !

वर्ष १९९७ ते २००२ पर्यंत माझ्या यजमानांना ‘अल्सरेटिव्ह कोलायटीस’(मोठ्या आतड्याचा दीर्घकालीन दाहक प्रकारचा आजार) हा अत्यंत त्रासदायक आजार झाला. माझी मुले लहान होती, तरी मला कसलीच भीती वाटली नाही.

नोकरी करत असतांना व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रयत्न तळमळीने करणारे नाशिक येथील श्री. नीलेश नागरे (वय ४४ वर्षे) !

दादा प्रत्येकाशी आदराने आणि प्रेमभावाने बोलत होते. ‘दादांमधील नम्रता, प्रेमभाव, आदरयुक्त वर्तणूक अन् चैतन्य यांचा परिणाम त्यांच्या कार्यालयातील कर्मचार्‍यांवर झाला आहे अन् ते सर्व जण दादांचे अनुकरण करत आहेत’, असे आम्हाला जाणवले.

सोलापूर रस्ता ते पुणे-बेंगळूरू रस्त्याच्या रिंगरोडसाठी ८ आस्थापनांकडून निविदा !

सोलापूर रस्ता ते पुणे-बेंगळूरूच्या दरम्यानच्या ३१ कि.मी. लांबीच्या प्रस्तावित रिंगरोडच्या कामासाठी ‘एम्.एस्.आर्.डी.सी.’ने (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने) मागवलेल्या निविदांची मुदत संपुष्टात आली आहे.

मुंबईत ५ वर्षांत विविध प्रकारच्या रस्त्यांचे प्रकल्प उभारणार !

येत्या पाच वर्षांमध्ये मुंबईत रस्त्यांची तब्बल ५८ सहस्र कोटींची कामे केली जाणार आहेत. एम्.एम्.आर्.डी.ए. (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण)ने या प्रकल्पाला संमती दिली आहे.

कृत्रिम बुद्धीमत्तेच्या साहाय्याने गंभीर आजारांचे वेळेपूर्वी निदान !

मुंबई विद्यापिठाने प्रामुख्याने महिलांमधील आणि अन्य गंभीर आजार  यांचे आगाऊ निदान करण्यासाठी काही रुग्णालयांच्या साहाय्याने कृत्रिम बुद्धीमत्ता मॉडेलचा विकास करण्याची योजना हाती घेतली आहे.

२९ सप्टेंबर या दिवशी ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजने’चा तिसरा हप्ता !

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसर्‍या हप्त्याचे वितरण २९ सप्टेंबर या दिवशी होणार आहे. याविषयीची अधिकृत माहिती महिला आणि बालविकास कल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

बंदी असूनही फोंडा येथे विसर्जनस्थळी आढळल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या २० श्री गणेशमूर्ती !

गोव्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती विक्रीवर बंदी असूनही यंदा फोंडा परिसरात श्री गणेशचतुर्थीनंतर विविध विसर्जन स्थळांवर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या एकूण २० मूर्ती आढळल्या आहेत.