नाशिक येथील सनातनचे साधक श्री. नीलेश नागरे (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ४४ वर्षे) हे महाराष्ट्र राज्य विद्युत् वितरण कंपनी (एम्.एस्.इ.डी.सी.एल्. (MSEDCL), निफाड, जिल्हा नाशिक) येथील आस्थापनात ‘उपकार्यकारी अभियंता’ या पदावर कार्यरत आहेत.
‘एकदा गुरुपौर्णिमेच्या प्रसारानिमित्त आम्ही श्री. नीलेश नागरे यांच्या कार्यालयात गेल्यानंतर आम्हाला जाणवलेली सूत्रे, आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. जाणवलेली सूत्रे
अ. ‘इतर सर्व शासकीय कार्यालयांमध्ये जसा गडबड-गोंधळ असतो, तसा दादांच्या कार्यालयात दिसला नाही. तेथे सर्व जण अगदी शांतपणे काम करत होते.
आ. दादांच्या ‘केबिन’मध्ये मला आश्रमाप्रमाणे शांतता जाणवली.
इ. दादा प्रत्येकाशी आदराने आणि प्रेमभावाने बोलत होते. ‘दादांमधील नम्रता, प्रेमभाव, आदरयुक्त वर्तणूक अन् चैतन्य यांचा परिणाम त्यांच्या कार्यालयातील कर्मचार्यांवर झाला आहे अन् ते सर्व जण दादांचे अनुकरण करत आहेत’, असे आम्हाला जाणवले.
ई. दादांनी त्यांच्या केबिनमध्ये बारीक आवाजात श्री दुर्गादेवीचा नामजप लावलेला होता.
२. आलेल्या अनुभूती
अ. नीलेशदादांच्या कार्यालयात इतर सर्व कर्मचारी बाहेरील बाजूस बसलेले असतात. त्या भागात आम्हाला उष्मा जाणवला. नंतर आम्ही दादांच्या ‘केबिन’ मध्ये गेल्यानंतर तेथे आम्हाला गारवा जाणवला.
आ. दादांच्या ‘केबिन’मध्ये आम्हाला सात्त्विक आणि मंद सुगंध आला.
इ. त्यांच्या ‘केबिन’ मधील श्रीकृष्णाच्या चित्राकडे बघितल्यावर ‘त्यातील सात्त्विकता नेहमीपेक्षा वाढलेली असून त्यातून अधिक चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे आम्हाला वाटले.
३. शिकायला मिळालेली सूत्रे
अ. दादांची स्वभावदोष-निर्मूलनाचे लिखाण करण्याची सारणी त्यांच्या पटलावरच असते. यावरून आम्हाला त्यांचे व्यष्टी साधनेविषयीचे गांभीर्य शिकायला मिळाले.
आ. ‘साधना करण्याची तळमळ असेल, तर आपण कोणत्याही परिस्थितीत सातत्याने अन् नियमितपणे साधनेचे प्रयत्न करू शकतो’, हे दादांच्या उदाहरणावरून आम्हाला शिकायला मिळाले.’
– कु. प्रियांका शिंदे आणि श्री. शांताराम शिंदे, गाजरवाडी, निफाड, जिल्हा नाशिक. (४.७.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |