सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या सत्संगामध्ये श्रीमती मनीषा केळकर यांना शिकायला मिळालेली सूत्रे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

 १. ‘साधकांच्या प्रत्येक क्षणाचा वापर साधनेसाठी व्हायला हवा’, यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा कटाक्ष असणे

‘एके दिवशी रामनाथी आश्रमात आम्हाला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या (गुरुदेवांच्या) भावसत्संगाला उपस्थित रहाण्याची संधी मिळाली. भावसत्संग चालू असतांना गुरुदेवांची औषधे घेण्याची वेळ झाली. त्या वेळी गुरुदेवांनी सौ. स्वाती शिंदे (आध्यात्मिक पातळी टक्के ६६ टक्के, वय ३७ वर्षे), सौ. वर्धिनी गोरल (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय २८ वर्षे) आणि कु. प्रांजली शिरोडकर या तिघींना आम्हाला साधनेविषयीची सूत्रे सांगायला सांगितली. तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव ‘स्वत:चा आणि इतरांचा एक सेकंदही वेळ वाया जाऊ देत नाहीत’, हे मला शिकायला मिळाले.

श्रीमती मनीषा विजय केळकर

२. सच्चिदानंद परब्रह्मस्वरूप गुरुदेवांनी साधनेची गती वाढवण्यास सांगितल्यावर स्वत:च्या साधनेची स्थिती लक्षात येणे

मला वाटत होते, ‘माझी साधना नीट चालू आहे.’ सत्संगात गुरुदेवांनी मला ‘साधना वाढवण्यासाठी साधकांशी बोलायला हवे. आपल्या अडचणी मांडायला हव्यात’, असे सांगितले. यावरून मला माझ्या साधनेची स्थिती लक्षात आली.

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेली भावसत्संगातील उद्बोधक सूत्रे

अ. ‘सनातन हा एक परिवार आहे. साधकांनी स्वतःच्या अडचणी दायित्व असलेल्या साधकांना सांगायला हव्यात.

आ. साधकांनी इतर साधकांची काळजी घ्यायला हवी.

इ. साधकांनी प्रवासात स्वतःजवळ सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने ठेवल्यास तिथेही त्यांना सेवा करता येते.

ई. साधक स्वतः रुग्णाईत असतांना त्यांना रुग्णालयातील इतर रुग्णांना साधना सांगण्याची सेवा करता येते.

४. मला भावसत्संगात पुष्कळ चैतन्य मिळाले आणि आनंद अनुभवता आला.’

– श्रीमती मनीषा केळकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक