‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे महाविकास आघाडीकडून सरकारला ‘जोडे मारा’ आंदोलन !

राजकोट दुर्गावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून १ सप्टेंबर या दिवशी मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे ‘जोडे मारा’ आंदोलन करण्यात आले.

मीरारोड येथील गोमांस तस्कर कुरेशी याच्यावर हद्दपारीची कारवाई !

मीरारोड येथील गोमांस तस्कर आणि जनावरे यांचा अवैध विक्रेता कासमअली शरीफ कुरेशी (वय ५३ वर्षे) याला मीरा-भाईंदर पोलिसांनी हद्दपार केले आहे.

छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचे राजकारण्यांनी  स्वार्थासाठी भांडवल करू नये ! – शिवभक्त स्वप्नील घोलप

छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने वाशी येथे निषेध आंदोलन करण्यात आले.

गणेशोत्सवासाठी राज्य पातळीवर ३ सहस्रांहून अधिक गाड्यांचे आरक्षण

गणेशोत्सवातील अधिक बसगाड्यांची मागणी लक्षात घेता नवीन गाड्या खरेदी करून त्यांचा वापर होण्याची प्रक्रिया आधीच का झाली नाही ?

नवी मुंबईत रोजगाराच्या विपुल संधी ! – संदीप नाईक, जिल्हा अध्यक्ष, भाजप

‘संदीप नाईक प्रतिष्ठान’च्या वतीने आयोजित १० व्या विनामूल्य महारोजगार मेळाव्याच्या प्रसंगी ते बोलत होते. या मेळाव्याचा ४५० उमेदवारांनी लाभ घेतला असून १८० उमेदवारांची तात्काळ निवड करण्यात आली आहे.

शालेय मुलीवर वाहनचालकाकडून अत्याचाराचा प्रयत्न !

विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या वाहनचालक नागनाथ गायकवाड याने शाळकरी मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी त्याला अटक करून ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.

वाकड (पुणे) येथे १० वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार !

१० वर्षांच्या अल्पवयीन मुलीला अश्लील चित्रफीत दाखवून तिच्यावर अत्याचार केला म्हणून अनिरुद्ध डबीर याला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : सानपाडा आणि तुर्भे येथे अनधिकृत पान टपर्‍यांवर कारवाई !; तुर्भे वाहतूक शाखेकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन !…

सानपाडा आणि तुर्भे येथील अनधिकृत पान टपर्‍यांवर कारवाईची मोहीम राबवण्यास प्रारंभ झाला आहे. अद्यापपर्यंत सातहून अधिक टपर्‍यांवर कारवाई करण्यात आली आहे.

प्रसिद्ध नादस्वर वादक शेषमपट्टी शिवलिंगम यांचा राज्यपालांच्या हस्ते ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मान !

देशातील ५० युवा नादस्वरम् कलाकारांना शिष्यवृत्ती प्रदान !

Ukrainian Drones : रशियाचा दावा : युक्रेनचे १५८ ड्रोन केले नष्ट !

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, त्यांच्या वायूदलाने युक्रेनचे १५८ ड्रोन नष्ट केले. त्यांपैकी २ मॉस्को शहराच्या वर आणि ९ आजूबाजूच्या भागात होते.