
मुंबई – मीरारोड येथील गोमांस तस्कर आणि जनावरे यांचा अवैध विक्रेता कासमअली शरीफ कुरेशी (वय ५३ वर्षे) याला मीरा-भाईंदर पोलिसांनी हद्दपार केले आहे. ठाणे, पालघर, मुंबई, मुंबई उपनगर या भागांतून कुरेशी याला २ वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.
वर्ष २०१६ ते २०२४ या कालावधीत मीरारोड येथील नयानगर, काशिगाव, काशिमीरा पोलीस ठाणे परिसर या भागात गोमांसाची तस्करी, अपहरण यांविषयी कुरेशी याच्यावर ७ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणी अटक होऊनही कुरेशी याच्याकडून अवैध गोमांस विक्रीचा धंदा चालूच होता. वर्ष २०२४ मध्येही कुरेशी याच्यावर गोमांस विक्रीप्रकरणी गुन्हे नोंद झाले आहेत. कुरेशी याच्यामुळे मीरारोड परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने त्याच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे, असे मीरा-भाईंदर पोलीस आयुक्त कार्यालयाकडून काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
हिंदूंनो धर्माभिमान जागृत करून धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हा ! – कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समिती
भ्रमणभाषच्या जगात वावरतांना श्रीकृष्णाचे स्मरण ठेवा – ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास
सत्संगात नसलेल्यांची स्थिती भरकटलेल्या पतंगासारखीच – ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास
निर्णयक्षमता गमावलेल्या युवकांसाठी भागवत ग्रंथ आधार वाटतो ! – ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास
पोलीस कर्मचारी आणि मुख्य आरोपी यांचा भ्रमणभाषवर संपर्क !
भ्रष्ट पोलीस धर्मांध आरोपींना पाठीशी घालत आहेत ! – हिंदु संघटनांचे गंभीर आरोप