
पिंपरी (पुणे) – १० वर्षांच्या अल्पवयीन मुलीला अश्लील चित्रफीत दाखवून तिच्यावर अत्याचार केला म्हणून अनिरुद्ध डबीर याला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. (नीतीमत्ता खालावत चालल्याने समाजात अल्पवयीन ते वयोवृद्ध स्त्रियांवर अत्याचार होत आहेत. समाजाची ही दु:स्थिती दूर करण्यासाठी कठोर शिक्षेसह समाज धर्माचरणाकडे वळवणे आवश्यक ! – संपादक) आरोपी अनिरुद्धने मुलगी १० वर्षांची असतांना तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिला अश्लील चित्रफीत दाखवत, धमकी देत वारंवार अत्याचार केला. शेवटी पीडितेने घडलेला प्रकार आईला सांगितल्यानंतर आईने पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला.
हिंदू युवतींनी अबला न होता दुर्गेचे रूप धारण करावे ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
आषाढी वारीत नियमबाह्य आणि मनमानी भाडे आकारणीवर कडक कारवाई !
‘जीविधा’ संस्थेच्या वतीने हिरवाई महोत्सवाअंतर्गत व्याख्यानमाला !
वटपौर्णिमेनिमित्त ठाणे जिल्ह्यातील श्री मलंगगडावर मलंगनाथांच्या समाधीची भक्तीभावाने आरती !
पावसाचा जोर अल्प असल्याने धरणातील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलतेन अल्पच
आरोपींच्या कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ !